कराड येथे 22 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
सातारा दि. 17 : जागतिक युवा कौशल्य सप्ताहानिमित्त सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी 22 जुलै रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व शिक्षण मंडळ, कराड संचालितक महिला महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला महाविद्यालय, कराड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, कुशल व अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे 1500 जास्त रिक्तपदे https://rojgar.













