Thu, Jan 15, 2026
महिला विशेष यशोगाथा

सौ. संगीता मुके यांना द प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड जाहीर

सौ. संगीता मुके यांना द प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड जाहीर
Ashok Ithape
  • PublishedMay 22, 2025

उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल गोव्यात होणार सन्मान.

वाई / प्रतिनिधी : येथील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ. संगीता मुके यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा असा “द प्राइड ऑफ इंडिया – भास्कर अवॉर्ड” जाहीर झाला आहे. उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल गोव्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार असून या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

गेल्या 21 वर्षांपासून महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना “द प्राइड ऑफ इंडिया – भास्कर अवॉर्ड” या पुरस्काराने गौरवण्यात येते. दरवर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा गोवा राज्याची राजधानी पणजी येथे दिमाखदार स्वरूपात साजरा होत असतो. यंदा पणजीत मीरामार बीच मार्गावरील दीनानाथ मंगेशकर सांस्कृतिक सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 26 मे रोजी सकाळी अकरा वाजता हा पुरस्कार वितरण समारंभ होईल. त्यावेळी भाजपाचे गोवा राज्य माजी अध्यक्ष खा. सदानंदशेठ तानावडे, पर्यटन मंत्री रोहन कवठे, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत ,महिला काँग्रेसच्या राज्याध्यक्ष डॉ. प्रतिक्षा खलप, दैनिक तरुण भारतचे आवृत्तीप्रमुख सागर जावडेकर, कोल्हापूरच्या हृदयरोग तज्ञ डॉ. पियू धनवडे, पाचगणीच्या बिली मोरया हायस्कूलच्या संचालिका श्रीमती आदिती गोराडिया, पलूस येथील जनसेवा महिला सोसायटीच्या संस्थापक अर्चनाताई माळी, भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्कचे संस्थापक राजीव लोहार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना सौ संगीता मुके यांनी मागील पाच वर्षांपासून आय कॅन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, सैनिक स्कूल, नवोदय इत्यादी स्पर्धा परीक्षांमधून चमकवले आहेत.. हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य, आणि आवश्यक मदत करण्यात त्या अग्रभागी असतात. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाच्या बरोबरीनेच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांची ख्याती आहे.

यापूर्वीही विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला असून “द प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड” सन्मानाबाबत विविध मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!