Thu, Jan 15, 2026
कलाकार कट्टा

अभिनय जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल – अभिनेता आमिर खान

अभिनय  जितके प्रामाणिकपणे कराल,  तितके ते उत्तम होईल – अभिनेता आमिर खान
Ashok Ithape
  • PublishedMay 6, 2025

जे त्या दृष्यामध्ये अपेक्षित आहेते करा आणि निव्वळ तुमच्या स्वतःच्या कामापुरता विचार करू नका“.

मुंबईदि. 4 :- एआय तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडत आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना  तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे करालतितके ते उत्तम होईल असल्याचे सांगून ‘अभिनयाची कला’ या विषयावरील त्यांच्या अतिशय सहजसोप्या आणि उपयुक्त सल्ल्यांनी अभिनेता आमिर खान यांनी वेव्हज 2025 मध्ये अनेकांची मने जिंकली.

आमिर खान पुढे म्हणाले कीमी प्रशिक्षित अभिनेता नाहीमी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाण्याची माझी इच्छा होतीपण जमलं नाहीमी माझ्या वाटचालीत या लहानलहान गोष्टी शिकलोज्या माझ्यासाठी उपयोगी ठरल्या.

चित्रपट निर्मितीच्या भविष्याबद्दल बोलतानाआमिर खान म्हणाले कीएआय तंत्रज्ञानामुळे आता अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहेएआय आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नंतर दृश्यात अभिनेत्याला जोडले जाऊ शकते.

एखाद्या अभिनेत्यासाठी सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे त्या पात्राच्या मनात प्रवेश करणे,  असे या अष्टपैलू अभिनेत्याने सांगितले,  ज्यांनी गेल्या अनेक वर्षांत साकारलेल्या अनेक अविस्मरणीय भूमिकांची भारतीय सिनेमाला भेट दिली आहेआणि  त्या भूमिकेच्या अंतरंगात ते कशा प्रकारे सामावून जातातत्यावर या सिनेक्षेत्राला वाहून घेतलेल्या अभिनेत्याचे उत्तर आहे, “मी स्क्रिप्टसोबत खूप वेळ घालवतोमी पटकथा पुन्हा पुन्हा वाचतोजर पटकथा चांगली असेलतर तुम्हाला त्या पात्राची समज येईलत्याचे भौतिक स्वरुपवृत्ती इत्यादी सर्व काही त्यातूनच येईल”. याव्यतिरिक्तदिग्दर्शकाशी पात्राबद्दल आणि कथेबद्दल चर्चा केल्याने देखील कल्पना येते.

अतिशय परिश्रम करण्याच्या आपल्या वृत्तीविषयी स्पष्टीकरण देताना आमिर खान यांनी सांगितले, “माझी स्मरणशक्ती कमी आहेत्यामुळे मी हाताने संवाद लिहितोसर्वात आधी मी अवघड दृश्ये करायला घेतोसंवादांचे पाठांतर झालेच पाहिजेपहिल्या दिवशी मी केवळ त्यावर काम करतोतीन ते चार महिने मी दररोज तेच करत राहतो आणि मग त्यामध्ये शिरतोसंवाद हे तुमच्यामध्ये सामावले पाहिजेतते तुमचे स्वतःचे वाटले पाहिजेतज्यावेळी ते लिहिले गेले तेव्हा ते पटकथाकाराचे होतेपण नंतर ते तुमचे झाले आहेतज्यावेळी तुम्ही एक ओळ पुन्हा पुन्हा उच्चारतातेव्हा तुम्हाला जाणीव होते की हे तुम्ही अनेक प्रकारे करू शकता.

कलाकारांसाठी सर्वात कठीण काम कोणते असतेत्यावर आमिर खान म्हणालेकी कलाकाराला दररोज पुन्हा पुन्हा त्याच उत्कटतेने भावनिक अभिनय सादर करावा लागणे.

नवोदित कलाकारांसाठी आमिर खान यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे – “तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे करालतितके ते उत्तम होईल“.

तरमग खुद्द आमिर खान त्यांच्या दृश्यांचा सराव कसा करतात?

याचे उत्तर असेकी “मी शॉट्स देण्यापूर्वी त्या दृश्याची कल्पना करतो आणि त्या दृश्यांचा सराव करत असताना मी कधीच आरशात पाहत नाही.”

आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपैकी आमिर खान यांचा आवडता चित्रपट कोणताअनेकांनी अंदाज लावलाच असेलकी तो चित्रपट ‘तारे जमीन पर‘ असावातर होयकारण या चित्रपटाने अनेक पालकांना त्यांच्या मुलांशी संयमाने वागायलात्यांना प्रसंगी आधार द्यायला आणि त्यांच्या लहान मुलांशी सहानुभूतीपूर्वक वागायला शिकवले!

अभिनय क्षेत्रात सुरुवात करणाऱ्या नवोदितांसाठी या ज्येष्ठ अभिनेत्याकडे आणखी कोणत्या टिप्स आहेत?

भावना या पटकथेतूनच समोर येताततुमचा पटकथेवर विश्वास असावा लागतोकधीकधी चित्रपटांमध्ये अशी काही दृश्ये असतातजी अविश्वसनीय वाटतातपण अभिनेता तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतोत्यामुळे अभिनेत्याला प्रेक्षकांना पडद्यावर दाखवली जाणारी गोष्ट पटवून सांगावी लागते“.

चांगली पटकथा म्हणजे काय असतेआमिर खान यांनी उत्तरात सांगितलेकी “चांगल्या पटकथेला उत्तम संकल्पनेचा आधार असावा लागतोकथेच्या पहिल्या दहा टक्के भागात कथानकाचे ध्येय निश्चित झाले पाहिजेनाहीतर प्रेक्षकांचा हिरमोड होईल“.

मात्रचित्रपटामध्ये सहभागी असलेल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे – “जे त्या दृष्यामध्ये अपेक्षित आहेते करा आणि निव्वळ तुमच्या स्वतःच्या कामापुरता विचार करू नका“.

यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्या हस्ते आमिर खान यांचा सत्कार करण्यात आला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!