Thu, Jan 15, 2026
क्रीडा

राष्ट्रीय स्तरावरील डॉजबॉल संघास पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या शुभेच्छा.

राष्ट्रीय स्तरावरील डॉजबॉल संघास पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या शुभेच्छा.
Ashok Ithape
  • PublishedApril 30, 2025

डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया संलग्न वर्ल्ड डॉजबॉल असोसिएशन 17 वर्षाखालील राष्ट्रीय डॉजबॉल 2025 ची चँपियनशिप स्पर्धा दि.2 मे ते 6 मे 2025 रोजी पार पडणार आहेत.

रत्नागिरी l प्रतिनिधी : राष्ट्रीय स्तरावरील निवड झालेल्या या संघास पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएन तथा रत्नागिरी जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या वतीने संघास कीट वाटप करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा डॉजबॉल असो. अध्यक्ष श्री राजेश जाधव, सचिव उदयराज कळंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धा केरळ डॉजबॉल असोसिएशन च्या वतीने ऑपस मथुतुला पलखड केरळ येथे पार पडणार आहेत. या संघाच्या संघ व्यवस्थापक म्हणून सौ. ऋतुजा राजेश जाधव या .संघाच्या संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत. या संघाचे प्रशिक्षक श्री शरद बढे,श्री संतोष कोळी, नंदकिशोर गायके, हे आहेत. राज्याचे डॉजबॉल संघटनेचे सचिव डॉ.प्रा. हनुमंत लुंगे( शिवछत्रपती अवॉर्ड विजेते ) यांनी महाराष्ट्राच्या संघास शुभेछा दिल्या.

या संघात रत्नागिरी जिह्यातील चार खेळाडू सहभागी आहेत. मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलीत
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे या प्रशालेच्या त्या विद्यार्थीनी आहेत. या प्रशालेच्या अंतरा अनंत वरवटकर,श्रेया मंदार अजगोलकर,नंदिनी रविंद्र जाधव,रिया कैलास पावस्कर यांचा सहभाग आहे.

यावेळी खंडाळा येथील श्री राजेश जाधव, श्री. कळंबे सर,दि मॉडेल इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापाक श्री विलासराव कोळेकर,रत्नागिरी तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबु म्हाप, सुदेश मयेकर हे संघास शुभेच्छा देण्यासाठी यावेळी उपस्थित होते. या संघाच्या सरावासाठी श्री एस. आर. जाधव,श्रीपाद गुरव, दतात्रय मांजरेकर, प्रथमेश रसाळ, अमित आग्रे, केतन जगताप, सुरज पवार, संतोष सुर्वे, यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच श्री विचारे साहेब, संतोष कदम, आदींनी या संघाच्या प्रॅक्टीससाठी सहकार्य केले.गेले आठवडाभर हा राज्याचा संघ लक्ष्मी चौक मैदान, रत्नागिरी येथे सराव करत होता.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!