श्री मालोबा विकासमंचच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
![]()
मालदेववाडी तरूणांचा वर्धापनदिनी सुत्य उपक्रम
पाचवड (प्रतिनिधी) : गावकडच्या माणसांना दैनंदीन धावपळीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. हीच बाब लक्षात घेत मालोबा विचार मंचच्या वर्धापनदिनी गावातील सर्व नागरिकांसाठी भव्य आरोग्य चिकित्सा शिबीर भरवण्यात आलं. सगळ्यांच आरोग्य तपासणी एका ठिकाणी होत नाहीत आणि यासाठी मोठ्या प्रमाणात पैसै खर्च करावे लागतात म्हणूनच सगळ्यांचा अभ्यास करून श्री मालोबा विचार मंचच्या वतीने हनुमान मंदीर येथे भव्य आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मालदेववाडी ता.वाई येथे डाँ राजूखान सय्यद,यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज आरोग्य केंद्रातील तज्ञ डॉक्टर, माध्यमातून साधारणतः340 जणांची मोफत आरोग्य चिकित्सा केली गेली.90 कास्य थाळी थेरेपी 120 जणांची फुट रेफ्लीक्सोलोजी थेरेपी 14 रूग्णांची मोतीबिंदू शस्ञक्रिया शिबिरात डोळेतपासणी तसंच स्त्री रोग तपासणी केली गेली,रक्त तपासणी याचसोबत स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येणारे विकार,ब्लडप्रेशर,शुगर,लहान मुलांची तपासणी केली गेली. त्याचबरोबर या शिबिरात आरोग्य विषयक सल्लाही देण्यात आला.आपण किती कामात व्यस्त असलो तरी आरोग्याची काळजी घेणं गरजेच असा सल्लाही दिला. त्याचबरोबर जर या शिबिरात केलेल्या तपसणीमध्ये कोणास एखादा आजार निष्पन्न झाल्यास त्यांना पुढील उपचारासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाईल अशी माहिती मालोबा विकास मंचच्या समितीने दिली.
या संपूर्ण शिबिरची तांत्रिक जबाबदारी श्री मालोबा विचार मंच मुंबई (मालदेववाडी)च्या मनोज एरंडे यांनी घेतली होती तर मालोबा विचार मंचच्या सर्वच सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या शिबिराचे आयोजन केले गेले होते.गावातील ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
गावचा विकास हाच शहरी तरूणांचा ध्यास
मुंबई-पुणे येथे नोकरी व व्यवसायानिमित्त गेलेल्या तरूणांचे श्री मालोबा विचार मंचच्या माध्यमातून विविध यशस्वी उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते, गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या प्रोत्साहन,वृक्षारोपन,बेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासारखे विविध उपक्रम हाती घेतले जातात.मालदेववाडी हे गाव सार्वजनिक कामात एकीसाठी पंचक्रोशीमध्ये प्रसिध्द आहे.
फोटो : मालदेववाडी:आरोग्य शिबिरामध्ये रूग्णाची तपासणी करताना वैद्यकीय स्टाफ













