वाई तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै.पुण्यनगरीचे बावधन प्रतिनिधी सचिन जयसिंग ननावरे यांची बिनविरोध निवड
वाई l प्रतिनिधी :
वाई तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. पुण्यनगरीचे बावधन प्रतिनिधी सचिन जयसिंग ननावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी कृष्णात घाडगे,(दै. महासत्ता) कुमार पवार (दै.प्रभात) सचिवपदी विठ्ठल माने(दै. सकाळ)यांची निवड करण्यात आली.
वाई तालुका मराठी पत्रकार संघाची विशेष सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे, उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पत्रकार शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली वाई येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. सभेच्या सुरुवातीस मावळते अध्यक्ष विश्वास पवार यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या कामांचा आढावा सादर केला. यानंतर अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी एकमताने सचिन ननावरे यांनी अध्यक्ष पदी निवड केली.
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन ननावरे म्हणाले, जेष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकारी पत्रकारांच्या साथीने वाई तालुक्यातील पत्रकार संघटना बळकट करण्यावर आपण भर देणार आहोत. पत्रकारांचे प्रश्न, समस्या सोडविण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम तालुक्यात राबवून विधायक कार्यतून पत्रकार संघाला उर्जितावस्था प्राप्त करून दाखवू.
कार्यकारणी मध्ये कार्याध्यक्षपदी भद्रेश भाटे (दै.सकाळ) खजिनदारपदी जितेंद्र वारागडे (दै.पुण्यनगरी), सहसचिव अशोक इथापे (साप्ताहिक संकल्प न्यूज) तर सदस्यपदी पांडुरंग भिलारे (दै.लोकमत) किशोर रोकडे (दै.ऐक्य) ),राजगुरू कोचळे (सातारा न्यूज), ओमकार पोतदार (दै.पुढारी) पांडुरंग खरे (दै.तरुण भारत) चरण गायकवाड, शुभम कोदे (दै.पुढारी) इत्यादी मान्यवरांचा समावेश आहे.
या वेळी जेष्ठ पञकार श्री शिवाजीराव जगताप, श्री मधूसुदन नेने, श्री दत्ता मर्ढेकर, श्री विश्वास पवार, श्री राहुल तांबोळी, श्री जयवंत पिसाळ, श्री विलास साळुंखे, श्री अशोक येवले, श्री सचिन इथापे, श्री हेमंत बाबर, श्री बापू वाघ, पै.श्री तानाजी कचरे, श्री संजय माटे, श्री पांडूरंग खरे, श्री अनिकेत शिंदे, श्री प्रविण गाडे उपस्थित होते.
सचिन ननावरे यांच्याकडे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे. त्यांचे पत्रकारितेतील काम चांगले आहे, त्यांची संघटन कुशलता आम्ही पाचगणी मध्ये अनुभवली आहे. सचिन जुन्या नव्या पत्रकारांचा मेळ घालून चांगले काम उभारेल अशी खात्री आहे.”सचिन ननावरे व सहकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करू.” –
ना मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री,महाराष्ट्र













