Thu, Jan 15, 2026
साहित्य

वाई येथे 8 व 9 फेब्रुवारी कालावधीत ग्रंथमहोत्सव

वाई येथे 8 व 9 फेब्रुवारी कालावधीत ग्रंथमहोत्सव
Ashok Ithape
  • PublishedFebruary 6, 2025

सातारा दि. 6 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत लोकमान्य टिळक ग्रंथ  संग्रहालय वाई संचिलत रमेश गरवारे सभागृह, वाई येथे 8 व 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा या कार्यालयामार्फत आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव-२०२४ अंतर्गत ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवी संमेलन, लेखक व वाचक संवाद याबरोबरच ग्रंथोत्सवामध्ये विविध साहित्यिक कार्यक्रमांसोबतच शासकीय व बालभारती प्रकाशने, स्पर्धा परीक्षेचे ग्रंथस्टॉल आणि अन्य प्रकाशनांचे ग्रंथ प्रदर्शनासाठी व विक्रीकरिता उपलब्ध असणार आहेत. अशा या ग्रंथ, साहित्यिक व वाचक यांच्या आनंददायी व ज्ञानवर्धक मेळाव्यात जिल्हयातील सर्व ग्रंथप्रेमी व वाचकांनी सहभागी होऊन या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!