Sun, Apr 12, 2026
साहित्य

दिल्लीत पहिल्या महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा भव्य शुभारंभ

दिल्लीत पहिल्या महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा भव्य शुभारंभ
Ashok Ithape
  • PublishedApril 12, 2026

ग्रंथदिंडीने रंगली राजधानी; लीना मेहंदळे यांचा सामाजिक बदलासाठी प्रशासनाचा उपयोग करण्याचा संदेश

नवी दिल्ली : छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त ‘सरहद, पुणे’ आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा विभागा’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा प्रारंभ दिल्लीत अत्यंत उत्साहात आणि भव्य ‘ग्रंथदिंडी’ने झाला.

या दिंडीत ग्रंथराज #ज्ञानेश्वरी आणि इतर साहित्याचे विधिवत पूजन संमेलनाध्यक्ष लीना मेहंदळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय सह महालेखाकार सुप्रिया देवस्थळी, निवासी आयुक्त आर. विमला, विशेष आयुक्त श्वेता सिंघल, क्रांती खोब्रागडे नॅशनल बुक ट्रस्टच्या सचिव युवराज मलिक, सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांसह अनेक वरिष्ठ महिला प्रशासकीय अधिकारी उपस्थित होत्या.

पारंपारिक वेशभूषा आणि साहित्याचा जयघोष यामुळे दिल्लीचा परिसर मराठीमय झाला होता.संमेलनाच्या मुख्य सत्रात ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी आणि लेखिका लीना मेहंदळे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या, प्रशासकीय खुर्चीवर बसून केवळ फायली निकाली काढणे म्हणजे कर्तव्य नव्हे, तर त्या पदाचा वापर समाजातील अनिष्ट प्रथा मुळापासून उपटण्यासाठी करणे हीच खरी लोकसेवा आहे.

त्यांनी सांगली जिल्ह्यातील देवदासी प्रथा निर्मूलनासाठी दिलेल्या धाडसी लढ्याचा अनुभव सांगितला. देवीच्या कोपाची भीती झुगारून मी कायद्याचे रक्षण केले आणि त्या महिलांच्या मुलांचे पुनर्वसन केले, याचे मला मोठे समाधान आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!