सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी सौ. नयना गाडे यांना ‘महाराष्ट्र गौरव रत्न’ पुरस्कार
![]()
भुईंजच्या कन्येचा पुण्यात सन्मान; विद्यार्थ्यांना व महिलांना दिले भक्कम पाठबळ
भुईंज l प्रतिनिधी : भुईंज येथील सौ. नयना सुशांत गाडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल नुकत्याच पुणे येथे आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्र गौरव रत्न’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्यभर विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भुईंज येथून सामाजिक कार्याची प्रेरणा घेत सौ. गाडे यांनी सूत्रसंचालन व निवेदन या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचत अनेकांना मदत केली आहे. तसेच दुर्लक्षित व गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांना शैक्षणिक पाठबळ दिले आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या सातत्याने जनजागृतीपर व्याख्याने देत असून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भुईंज परिसरातील विविध संस्था व मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भुईंज येथे लवकरच नागरी सत्कार आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.













