Sat, Apr 11, 2026
अध्यात्म

पिराचीवाडी (आसले) येथे ४३ वा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात सुरू

पिराचीवाडी (आसले) येथे ४३ वा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात सुरू
Ashok Ithape
  • PublishedApril 8, 2026

काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन व नामस्मरणाच्या कार्यक्रमांनी गावात भक्तीचा उत्साह

भुईंज, प्रतिनिधी l पिराचीवाडी (ता. आसले) येथे ४३ व्या अखंड हरिनाम सप्ताहास शनिवारपासून अत्यंत भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागातून हा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडत असून संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

दररोज सकाळी काकड आरतीने कार्यक्रमांची सुरुवात होत असून त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचन आयोजित करण्यात येत आहे. रात्री विविध कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होत असून पहिल्याच दिवशी धनश्री ताई तरडे (बामनोली), नामदेव महाराज जाधव (रायगड), सुहास महाराज फडतरे (कुमटे), रोहिदास महाराज मालुसरे (मालुसरेवाडी), प्रदीप महाराज मामुलकर (दरे) व आनंद महाराज मिस्त्री (कुसुंबी) यांचे कीर्तन होणार आहे.

या सप्ताहाचे आयोजन हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून अन्नदाते म्हणून मोहन निवृत्ती भोसले, विजय भगवानराव चव्हाण, सुरेश फडतरे, दिलीप जाधव, तानाजी चव्हाण, संदीप जाधव, संजय जगताप, उत्तम फडतरे, प्रभाकर चव्हाण व अनिल फडतरे यांचे सहकार्य लाभत आहे.

तसेच दररोज सकाळी आठ वाजता दिंडी काढण्यात येत असून दिवसभराच्या कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या सहभागातून हा सप्ताह भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!