Wed, Mar 4, 2026
सामाजिक

‘एक हात मदतीचा’ उपक्रम आदर्शवत – डॉ. महेश मेणबुदले

‘एक हात मदतीचा’ उपक्रम आदर्शवत – डॉ. महेश मेणबुदले
Ashok Ithape
  • PublishedMarch 4, 2026

वाई | प्रतिनिधी : रोहिडेश्वर शिक्षण संस्था संचलित कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक आसरे विद्यालय, ता. वाई येथे ‘एक हात मदतीचा’ हा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय स्पोर्ट्स ड्रेस तसेच भगवद्गीता  ग्रंथांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. श्री. महेश मेणबुदले म्हणाले की, “विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत अध्यात्माची गोडी या वयात लागली, तर त्यांच्या जीवनावर उत्तम संस्कार घडतात.”

विश्वरूप वारकरी शिक्षण संस्था, रेणावळेचे संस्थापक ह.भ.प. सुहास गवळी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना भगवद्गीता ग्रंथ देण्यात आल्याबद्दल डॉ. मेणबुदले यांनी विशेष कौतुक केले.
याच कार्यक्रमात डॉ. मेणबुदले यांनी आपल्या वडील कै. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले यांच्या स्मरणार्थ ५,५५५ रुपये देणगी व तीन विद्यार्थी दत्तक घेण्याची घोषणा केली.

श्री. सिद्धार्थ पाटील, विकास अधिकारी, एलआयसी शाखा वाई यांनी मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षकवृंदाच्या सहकार्याने कर्मचारी संतोष डगळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘एक हात मदतीचा’ व विद्यार्थी दत्तक पालक योजनेचे भरभरून कौतुक केले. समाजात अशा उपक्रमांची मोठी गरज असल्याचे नमूद करत त्यांनीही एक विद्यार्थी दत्तक घेण्याची घोषणा केली.

दैनिक पुढारीचे पत्रकार श्री. विकास जाधव यांनी या योजना गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील असे सांगून एक विद्यार्थी दत्तक घेण्याचे जाहीर केले.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेश तायडे यांनीही मार्गदर्शन करत विविध माध्यमांतून विद्यालयाला मदत करण्याचे आश्वासन दिले.
श्री. विशाल सणस, संचालक, सर्वोदय सेवा ट्रस्ट, वाई यांनी एक विद्यार्थी दत्तक घेऊन पहिल्या वर्षाचे ४,००० रुपये जमा केल्याबद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तसेच श्री. निलेश पवार (माजी चेअरमन, धोम विकास सेवा सोसायटी) व श्री. भिकू दादा सणस (सदस्य, ग्रामपंचायत रेणावळे) यांनी प्रत्येकी एक विद्यार्थी दत्तक घेण्याची घोषणा केली.

कार्यक्रमास सुरेश वाघ, बाबुराव चोरट, नितीन शेलार, नारायणदादा सणस, राजाराम कोंढाळकर, बाबुराव खंडू सणस, आनंदा कांबळे, अशोक बाजीराव सणस, शिवाजी पिसाळ, अनिल पवार, तुषार सणस, साहेबराव सणस, सुभाष वैराट, वसंत गाडेकर, सदाशिव सणस यांच्यासह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. समीर सय्यद यांनी केले.
प्रास्ताविक प्रकाश जाधव, तर आभार संतोष डगळे यांनी मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!