तांबेचीतार चोरी प्रकरणी वाई गुन्हेप्रकटीकरण विभागाची मोठी कारवाई
![]()
०६ आरोपी अटकेत; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त — सात गुन्ह्यांचा उलगडा
वाई | प्रतिनिधी — दि. २३ फेब्रुवारी २०२६ वाई पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रोहित्रांमधील (डिपी) ताब्यांच्या तांबे तारेची चोरी मोठ्या प्रमाणावर सुरू होती. या बहुचर्चित गुन्ह्यांचा छडा लावत वाई गुन्हेप्रकटीकरण विभागाने ०६ आरोपींना अटक करून सुमारे १७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सूचनेनुसार तपासाला वेग देण्यात आला. धोम कॅनॉलच्या कडेला असलेल्या रोहित्र परिसरात सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडथळे येत होते. मात्र तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या माहितीच्या आधारे तपासपथकाने आरोपींचा माग काढला.
तपासात फलटण येथील ०३ आरोपी व वाई येथील ०३ आरोपी असा साखळी उघडकीस आली. आरोपींकडून ३०० किलो तांबे तार, गुन्ह्यात वापरलेल्या ०२ दुचाकी, ०१ चारचाकी वाहन तसेच ०५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
अटक आरोपींची नावे :
मुकेश माणिक जाधव (वय ४५), रा. मलठण, फलटण
अनिकेत सुभाष बनसोडे (वय २२), रा. मलठण, फलटण
अर्जुन राजू जाधव (वय २०), रा. मलठण, फलटण
रोहन लाखन घाडगे (वय २४), रा. यशवंतनगर, वाई
विजय बाबुराव शिंदे (वय ३६), रा. यशवंतनगर, वाई
मनोज नामदेव घाडगे (वय ४०), रा. यशवंतनगर, वाई
यातील आरोपी क्रमांक १ ते ३ सराईत गुन्हेगार असून, आरोपी क्रमांक २ व ३ यांना यापूर्वी फलटण शहर पोलीस ठाणे येथून सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.
उघडकीस आलेले गुन्हे (वाई पोलीस ठाणे):
गु.र.नं. २२३/२०२५, २८६/२०२५, ३०३/२०२५, ०३/२०२६, ०६/२०२६, २१/२०२६, ३९/२०२६
कलम — भा.न्या.स. ३०३(२), ३२४(४) व भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल गवळी तसेच तपासपथकातील अधिकारी-अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाई गुन्हेप्रकटीकरण विभागाचे अभिनंदन केले आहे.













