Wed, Feb 25, 2026
सामाजिक

जेष्ठ पत्रकार महेंद्र जाधव यांना ‘शिवक्रांती शिवभूषण’ पुरस्कार

जेष्ठ पत्रकार महेंद्र जाधव यांना ‘शिवक्रांती शिवभूषण’ पुरस्कार
Ashok Ithape
  • PublishedFebruary 21, 2026

किल्ले वैराटगडावर शिवप्रेमींच्या साक्षीने दिमाखदार सन्मान सोहळा

वाई | प्रतिनिधी

पत्रकारितेच्या माध्यमातून गेली तीन दशके अविरत सामाजिक कार्य आणि शिवछत्रपतींच्या वंशजांच्या तीन पिढ्यांची निष्ठापूर्वक केलेली शिवसेवा यांचा गौरव म्हणून जेष्ठ पत्रकार महेंद्र (आबा) जाधव यांना यंदाचा मानाचा ‘शिवक्रांती शिवभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री किल्ले वैराटगड येथे हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

हा सन्मान सोहळा नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. ज्ञानदेव रांजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ह.भ.प. प्रविण महाराज शेलार, शिवदत्त मठाचे महंत शिवदत्त कवितागिरी पांचाळ, नगरसेविका सीमा भोसले, सरपंच सौ. अमृता जाधव तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या सौ. रूपालीताई भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महेंद्र जाधव यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री स्वप्नील धनावडे व शिवश्री प्रविण कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या दुर्ग संवर्धन आणि सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. या विधायक कार्यास सदैव पाठबळ देण्याची ग्वाही मान्यवरांनी दिली.

या वेळी राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यामध्ये श्री. सागर धनावडे (अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा), श्री. जयदीप शिंदे (संचालक, जावली बाजार समिती), ॲड. अनिल सोनमळे (अध्यक्ष, सरपंच परिषद), ‘बघा बघा’ फेम पत्रकार श्री. महेश पवार, सरपंच श्री. मंगेश गायकवाड व उपसरपंच श्री. दिनेश गायकवाड यांचा समावेश होता.

किल्ले वैराटगडच्या पावन सानिध्यात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
पुरस्कार स्वीकारताना महेंद्र (आबा) जाधव म्हणाले, “३० वर्षांच्या पत्रकारितेच्या आणि शिवसेवेच्या प्रवासात हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्या लेखणीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वसामान्यांचा आणि शिवप्रेमींचा आहे. किल्ले वैराटगडच्या पवित्र भूमीत हा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण आहे. भविष्यात अधिक जोमाने सामाजिक कार्य व दुर्ग संवर्धनासाठी काम करण्याची ऊर्जा हा सन्मान देईल.”

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!