कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जबाबदार वापरासाठी जनजागृती प्रतिज्ञा मोहिम
सातारा दि. 16- भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दि. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी, 2026 या कालावधीमध्ये भारत मंडपम, नवी दिल्ली येथे इंडीया एआय समिट अँड एक्स्पो 2026 या समिटचे आयोजन करण्यात येत आहे. या समिटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा होणारा परिणाम विचारात घेऊन विविध राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहेत. इंडीया एआय व इंटेल इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने १६ व १७ फेब्रुवारी २०२६ (निर्धारित २४ तासांच्या कालावधीत सकाळी 8 वा. पासून देशव्यापी’ एआय जबाबदारी प्रतिज्ञा मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
जबाबदार, नैतिक व मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत जनजागृती करणे व नागरिकांचा व्यापक सहभाग नोंदविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
सर्व वयोगटातील विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, पालक व संरक्षक, सर्वसामान्य नागरिक, शासकीय अधिकारी व कर्मचारी, विविध उद्योग क्षेत्रातील कर्मचारी व प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात. सहभागी होण्यासाठी https://aipledge.indiaal.gov.













