कमंडलू विद्यालयात १३ लाखांचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित
![]()
प्लॅनेट वॉटर फाउंडेशन व डेट वायलर फार्माच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना सुरक्षित पिण्याचे पाणी
वेलंग / वाई : वाई तालुक्यातील आसरे येथील रोहिडेश्वर शिक्षण संस्थेच्या कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी अद्ययावत ॲक्वा पुरिफायर वॉटर फिल्टरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. डेट वायलर फार्मा पॅकेजिंग इंडिया लि. (केसुर्डी, ता. खंडाळा) व प्लॅनेट वॉटर फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने सुमारे १३ लाख रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील ग्रामस्थांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्लॅनेट वॉटर फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. चैतन्य कुसुरकर उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य मा. श्री. नंदकुमार कोकरे (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, नायगाव) होते.
यावेळी उद्योजक श्री. संतोष अंबवले (वाई), समाजसेवक श्री. आत्माराम सर्जेराव सणस (मुंबई), श्री. संजय जेधे देशमुख (अध्यक्ष, सर्वोदय ट्रस्ट, वाई), शाळेच्या माजी शिक्षिका सौ. शेख मॅडम, डॉ. श्री. रमेश तायडे, रोहिडेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक श्री. बाबूराव चोरट (भाऊ), श्री. दिनकर सणस, श्री. नारायण सणस (माजी तंटामुक्ती अध्यक्ष, आसरे), श्री. शिवाजीराव धनावडे (माजी सरपंच, दहयाट), श्री. विशाल सणस (सामाजिक कार्यकर्ते), श्री. अंकुश चोरट यांच्यासह ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास उद्योजक, समाजसेवक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. प्रकाश जाधव यांनी केले. सूत्रसंचालन श्री. समीर सय्यद यांनी पार पाडले, तर आभार प्रदर्शन श्री. संतोष डगळे यांनी मानले.
या महत्त्वपूर्ण जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीत प्राचार्य मा. श्री. नंदकुमार कोकरे यांचा मोलाचा वाटा असून आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शिक्षकवृंद व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाची साथ दिली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यदृष्ट्या सुरक्षिततेसह ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा घडविणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून, कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.













