महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी स्वीकारला कार्यभार
मंत्रालय, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी आज मंत्रालयात विधिवतपणे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होताना मंत्रालय परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
कार्यभार स्वीकारल्यानंतर श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, युवक तसेच वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या प्रगतीसाठी पारदर्शक, संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी मंत्रालयात उपस्थित मान्यवर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यात महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा हा राजकीय प्रवास राज्यातील महिला नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरणार असून, महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत हा एक नवा आणि महत्त्वपूर्ण अध्याय ठरेल, अशी भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.













