राज्यस्तरीय शालेय जम्प रोप स्पर्धेत बोरगाव शाळेची चमकदार कामगिरी; मुलींच्या संघास रौप्य पदक
![]()
न्यू इंग्लिश स्कूल बोरगावच्या विद्यार्थिनींचे राज्यपातळीवर यश, संस्थेकडून अभिनंदनाचा वर्षाव.
वाई: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, महाराष्ट्र जम्प रोप असोसिएशन, लातूर जिल्हा क्रीडा परिषद व लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय जम्प रोप क्रीडा स्पर्धा नुकत्याच धन्वंतरी मेडिकल कॉलेज, उदगीर (जि. लातूर) येथे पार पडल्या. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, बोरगाव येथील मुलींच्या संघाने जम्प रोप सांघिक क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थिनींचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. अशोक दुधारे साहेब तसेच लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा उपसंचालक श्री. महादेव कसगावडे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला.
विजेत्या संघामध्ये पुढील खेळाडूंचा समावेश होता :
कुमारी यशदा मेघा वाडकर (इयत्ता ८ वी),
कुमारी सई राजेंद्र वाडकर (इयत्ता ८ वी),
कुमारी सई मारुती पोळ (इयत्ता ८ वी),
कुमारी अक्षरा अंकुश भणगे (इयत्ता ९ वी).
या यशाबद्दल वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष श्री. नारायणराव वाडकर, उपाध्यक्ष श्री. नारायण वाडकर (गुरुजी), सचिव श्री. मधुकर वाडकर, माजी अध्यक्ष श्री. लक्ष्मणराव वाडकर (आप्पा), सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. संतोष वाडकर सर, भागशाळा प्रमुख श्री. विठ्ठल जाधव सर, राज्य व सातारा जिल्ह्याचे सचिव श्री. नितीन सुरवसे सर, प्रशिक्षक व क्रीडाशिक्षक श्री. अजित वाडकर सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटोओळी : यशस्वी खेळाडू समवेत संस्थेचे अध्यक्ष नारायणराव वाडकर मुख्याध्यापक श्री. संतोष वाडकर व क्रीडाशिक्षक श्री.अजित वाडकर, विजय वाडकर.













