Thu, Jan 15, 2026
Media

वाई तालुक्यातील पत्रकारांची पत्रकारिता सकारात्मक ; डॉ योगेश खरमाटे

वाई तालुक्यातील पत्रकारांची पत्रकारिता सकारात्मक ; डॉ योगेश खरमाटे
Ashok Ithape
  • PublishedJanuary 11, 2026

वाई येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा

वाई दि.९ :- पत्रकार हा समाजाचा आरसा असतो.समाजातील चांगल्या वाईट गोष्टी मांडताना वाई तालुक्यातील पत्रकार नेहमीच सकारात्मक असतात त्यामुळे वाई उपविभागात काम करताना ऊर्जा मिळते,असे गौरवोद्गार वाई उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले.

वाई येथील लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या रमेश गरवारे सभागृहात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्र जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पत्रकारांसाठी ठेवलेला ब्लेझर ड्रेसकोड. यामुळे सर्व पत्रकार आकर्षक, स्मार्ट व आत्मविश्वासपूर्ण दिसत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे होते .नगराध्यक्ष अनिल सावंत निवासी तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे,पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे,उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर,शिवाजीराव जगताप तालुकाध्यक्ष सचिन ननावरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. संस्थेचे अध्यक्ष व दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी सचिन ननावरे यांनी प्रास्ताविकात पत्रकार संघाच्या कामकाजाचा आढावा सादर केला.पुढील वाटचालीवर भाष्य केले.

जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर म्हणाले मी ४६ वर्षे पत्रकारीता करतोय, आतापर्यंत तालुक्यात एवढं अधिकारी आले त्यांनी सर्वांचे कौतुकच केले, अनेक ठिकाणी काम केले पण वाई सारखे चांगले पत्रकार कोठेही पाहयाला मिळाले नाहीत.असे ते बोलून दाखवीत.
माजी अध्यक्ष व लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी विश्वास पवार यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकारांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली, तर पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे यांनी पत्रकार व पोलीस यांची भूमिका समान असल्याचे सांगून वाईतील पत्रकारांच्या समाजाभिमुख भूमिकेचे जाहीर कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले. व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी संध्याकाळी ओझर्डे येथे आयोजित मेळाव्यामध्ये सर्व पत्रकारांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला व पुढील काळात पत्रकारांना त्यांच्या अडीअडचणीमध्ये सदैव आपण तत्पर असल्याचं आश्वासित करून पत्रकारांना सन्मानित केले.

उपस्थितांचे स्वागत दत्ता मर्ढेकर, भद्रेश भाटे, विश्वास पवार, विलास साळुंखे, धनंजय घोडके, जयवंत पिसाळ, कृष्णाथ घाडगे, पांडुरंग भिलारे, अशोक इथापे, किशोर रोकडे, विकास जाधव, कुमार पवार, अशोक येवले, बाळासाहेब सणस, चरण गायकवाड, संजीव महामुनी यांनी केले, आभार धनंजय घोडके यांनी मानले. यावेळी वाई तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!