Thu, Jan 15, 2026
आरोग्य

शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्याना रुग्ण सेवेची शपथ

शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्याना रुग्ण सेवेची शपथ
Ashok Ithape
  • PublishedJanuary 9, 2026

सातारा दि. 9–  जिल्हा रुग्णालय, सातारा अंतर्गत नर्सिंग कॉलेज येथील नव्याने सुरु झालेल्या बीएसस्सी नर्सिंग, तसेच एएनएम व जीएनएम या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांना यावेळी विद्यार्थ्यांना रुग्ण सेवेची शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती. याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, डॉ. पुरुषोत्तम मडावी उपसंचालक (शुश्रुषा) आरोग्य सेवा मुंबई, डॉ. निलिमा सोनावणे सहा. संचालक (शुश्रूषा) आरोग्य सेवा मुंबई, डॉ. विनायक काळे अधिष्ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सातारा, डॉ. युवराज करपे जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा, नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्या श्रीमती. सरला पुंड, डॉ. स्मिता लोंढे, श्रीमती. अनिता काळसेकर, तसेच नर्सिंग कॉलेजचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

या प्रसंगी नर्सिंग क्षेत्रातील शैक्षणिक प्रगती व समाजातील महत्त्व आधोरेखित करण्यात आले.   मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नर्सिंग क्षेत्रातील शैक्षणिक प्रगती व समाजातील महत्त्व आधोरेखित करुन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. पुरुषोत्तम मडावी उपसंचालक (शुश्रुपा) आरोग्य सेवा मुंबई यांनी सर्व विद्यार्थ्यांना रुग्णसेवेचे महत्त्व सांगितले. तसेच डॉ. निलीमा सोनावणे सहा. संचालक (शुश्रुपा) आरोग्य सेवा मुंबई यांनी नर्सिंग क्षेत्रातील शैक्षणिक व रोजगाराची संधी याबाबत अतिशय महत्त्वाचे व मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. युवराज करपे जिल्हा शल्यचिकित्सक, यांनी परिचारीका या रुग्णालयाच्या आधारस्तंभ असल्याचे व भावी परिचारीकांना रुग्णसेवेचे मार्गदर्शन केले. डॉ. विनायक काळे अधिष्ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सातारा यांनी देखील विद्यार्थी परिचारीकांना नैतिकता व रुग्णांशी आत्मियतेने वागण्याबाबत मार्गदर्शन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!