जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त दर्पणकारांना अभिवादन
सातारा दि. 6- जिल्हा माहिती कार्यालय सातारा येथे पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील राहूल पवार , वैभव जाधव, रूपाली तारळकर, आराध्या लोंढे, अनिल नलावडे, सचिन राऊत उपस्थित होते













