सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाती वाघिणींची मोहीम यशस्वी करण्यात सर्वांचा मोलाचा वाटा: तुषार चव्हाण
![]()
सह्याद्री व्याघ्र राखीवचा १६ वा वर्धापन दिन उत्साहात
सातारा : दिनांक ५.१.२०२६ रोजी सह्याद्री व्याघ्र राखीवचा १६ वा वर्धापन दिन कराड येथे मा. तुषार चव्हाण, क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्सहात संपन्न झाला. सदर वर्धापन कार्यक्रमास श्री. किरण जगताप, उपसंचालक, कोयना वन्यजीव विभाग, श्रीमती स्नेहलता पाटील, उपसंचालक, चांदोली वन्यजीव विभाग, श्री. शतनिक भागवत, कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन, प्रबोधिनी, कुंडल, श्री. श्रीकांत पवार, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) कोल्हापूर,मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, तसेच सह्याद्री व्याघ्र राखीवमधील सर्व सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, भारतीय वन्यजीव संस्थंचे संशोधक, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, प्राणी मित्र, नाना खामकर, पक्षी अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार विविध समाजमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुरवातीस मान्यवरांचे शुभहस्ते वटवृक्षास पाणी घालून कार्यक्रमास सुरवात झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. किरण जगताप, उपसंचालक, कोयना वन्यजीव विभाग यांनी मांडले. प्रास्तविकामध्ये सह्याद्री व्याघ्र राखीवची मागील १५ वर्षातील कामगिरीचा थोडक्यात आढावा त्यांनी मांडला. तदनंतर सह्याद्री व्याघ्र राखीवसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या आय.सी.आय.सी. आय फौंडेशन, कृष्णा विश्व विद्यापीठ, आनंदवन फौंडेशन, सह्याद्री वाईल्डलाईफ फौंडेशन, महाराट्र टाईम्स, तरुण भारत महा एम टी बी, रोव जंगली युवट्युब, वाईल्ड लाईफ इस्थमस, द ग्रासलॅण्ड पुणे, Rescue wildlife Trust Pune, Wildlife Conservation Turst, सदगुरु गाडगे महाराज महाविद्याल कराड, यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड, दादासाहेब चव्हाण मोमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मसुर यांचे प्रतिनिधींचा सह्याद्री व्याघ्र राखीवच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन, केलेल्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला. तद्नंतर सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये सुरु असलेल्या व्याघ्र पुनर्स्थापना (ऑपरेशन तारा) कार्यक्रमांतर्गत सह्याद्री व्याघ्र राखीवमधील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या प्रशंसनिय सेवेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरवचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
तदनंतर सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये “अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना २०२६ / २७ अनुषंगाने सुरु असलेल्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या चित्रफितीचे अनावरण, तसेच सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये सुरु असलेल्या व्याघ्र पुनर्प्राप्तीचे अनुषंगाने ताडोबा अंधारी व्याघ्र राखीवमधील स्थलांतरीत केलेल्या वाघांचे व सह्याद्रीमध्ये निसर्ग अधिवास निर्माण झालेल्या अशा एकुण पाच वाघांची यशोगाथा सांगणाऱ्या चित्रफितींचे उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. तद्नंतर उपस्थित मान्यवारांनी सह्याद्री व्याघ्र राखीवमधील प्रमुख घडामोडींबाबत थोडक्यात आपले मनोगत मांडले.

मा. तुषार चव्हाण, क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यामध्ये त्यानी सह्याद्री व्याघ्र राखीची विस्तृत यशोगाथा मांडली व भविष्यातील वाटचालीचा थोडक्यात आढावा दिला. तसेच सह्याद्रीच्या यशामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व सहभागीदारांचे आभार मानले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काम करताना अनेक अनुभव आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास नंबर वन बनवायचं असून ‘ऑपरेशन चंदा’ व ‘तारा’ वाघिणीची मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात सर्वांचा मोलाचा वाटा आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला चांगल्या प्रकारे बनवायचं असून त्यासाठी प्रकल्पातील प्रत्येकजण परिश्रम घेत असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी केले.
यावेळी रोहन भाटे म्हणाले की, २००६ व २००७ साली सह्याद्रीत वाघ होते.सह्याद्री मध्ये तीन नर वाघ आहेत आता दोन वाघीण आल्या आहेत हि चांगली गोष्ट आहे ह्यामुळे सह्याद्री मध्ये वंश्वृधी होणार आहे. आता वाघांमुळे मोठ्या प्रमाणात वन पर्यटन उदयास येणार आहे व त्यामुळे मोठी स्थानिक रोजगार निर्मिती होणार आहे.
नाना खामकर म्हणाले की, गेली ३० वर्षे सह्याद्री फिरत आहे. चंदा वाघिणीची क्लिप पाहिल्यावर २०१० सालची आठवण आली. त्यावेळी आम्ही बॉक्साईटच्या खाणीतुन होणारी ट्रक वाहतूक बंद करायला भाग पाडले. त्यानंतर २००१ मध्ये सह्याद्री व्याघ्र राखीवची मागणी केली. मागणीनंतर सहा वर्षांनी २०१० मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घोषित झाला. आता वन विभाग या प्रकल्पात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे याचा आनंद होत असल्याचे नाना खामकर यांनी सांगितले.
शेवटी कार्यक्रमाचे समारोपाचे भाषण श्रीमती स्नेहलता पाटील, उपसंचालक चांदोली वन्यजीव विभाग यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानुन, वर्धापन दिन कार्यक्रमाची सांगता झाली.
कर्यक्रमास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते













