वाईत सोमवारी नामदार मकरंद पाटील यांच्या हस्ते काळभैरवनाथ मेडिकलचे उद्घाटन
वाई प्रतिनिधी : वाई येथील सोनगीरवाडी परिसरात काळभैरवनाथ मेडिकल या नव्या वैद्यकीय सेवाकेंद्राचे उद्घाटन सोमवार, दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. नागरिकांना दर्जेदार, विश्वासार्ह व तत्काळ औषधसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मेडिकलची सुरुवात करण्यात येत आहे.
या उद्घाटन सोहळ्यास मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. मकरंद (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते तसेच किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. प्रमोद दादा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
काळभैरवनाथ मेडिकलच्या माध्यमातून परिसरातील सर्वसामान्य रुग्णांना औषधांची सुलभ व विश्वासार्ह सेवा मिळणार असून, ही सुविधा आरोग्यसेवेत एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
वाई तालुक्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अजय अप्पासाहेब पाटील (MBBS, DGO) यांचे पाटील हॉस्पिटल हे सातत्याने रुग्णांना उत्तम व दर्जेदार वैद्यकीय सेवा देत आहे. याच विश्वासार्ह सेवेमुळे पाटील हॉस्पिटल वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील रुग्णांचे एक विश्वासाचे केंद्र बनले आहे.
या मेडिकलचे निमंत्रक डॉ. अजय अप्पासाहेब पाटील असून, काळभैरवनाथ मेडिकलचे दैनंदिन कामकाज श्री. निखिल संदेश मोरे पाहणार आहेत. पाटील हॉस्पिटलच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाखाली आणि श्री. निखिल मोरे यांच्या व्यवस्थापनातून हे मेडिकल कार्यान्वित होणार असून, परिसरातील नागरिकांना औषधोपचारांची अधिक चांगली सुविधा उपलब्ध व्हावी, या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.













