गरवारे टेक्निकल फायबर्समध्ये आबासाहेब गरवारे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
![]()
गरवारे कंपनीत सामाजिक बांधिलकीची परंपरा; १२३ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
वाई, दि. २२ : गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने पद्मभूषण कै. आबासाहेब तथा भालचंद्र गरवारे यांची १२३ वी जयंती रक्तदान शिबीराने साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरात ३०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कै. आबासाहेब गरवारे यांच्या जयंती निमित्त्त कंपनीमध्ये दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. या वर्षीही रक्तदान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, अभिजीत जाेशी, जनरल मॅनेजर सचिन कुलकर्णी, चंद्रशेखर बदाने, मॅनेजर अंशुमन जगदाळे, सुनिल पानसे, अविनाश भाेसले बालाजी रक्तपेढीचे चेअरमन महेशकुमार भाेसले यांच्याहस्ते कै. आबासाहेब गरवारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. याप्रसंगी कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय म्हस्के , सेक्रटरी अर्जुन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुण शिबिराची सुरुवात करण्यात आली. हे रक्तदान शिबीर बालाजी रक्तपेढी सातारा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
पहिल्यांदाच रक्तदान शिबिरात ३०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात उत्स्फूर्तपणाने सर्व रक्तदात्यांना सहभाग घेतला. त्याबद्दल प्रत्येक रक्तदात्यास प्रशस्तिपत्रक देण्यात आली. शिबिर यशस्वितेसाठी अविनाश भाेसले, कुमार पवार, आकाश धनवे यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरात कंपनीतील सर्व कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
फाेटाे ओळी : रक्तदान शिबिराप्रसंगी अरविंद कुलकर्णी, अभिजीत जाेशी, सचिन कुलकर्णी, चंद्रशेखर बदाने, अंशुमन जगदाळे, संजय म्हस्के, अर्जुन सावंत व इतर













