Thu, Jan 15, 2026
आरोग्य क्रीडा

कॅन्सर निदान व निवारण जागृतीसाठी वाईकर धावणार!

कॅन्सर निदान व निवारण जागृतीसाठी वाईकर धावणार!
Ashok Ithape
  • PublishedDecember 18, 2025

रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे २० डिसेंबर रोजी ‘रोटरी रन २०२५’ व मोफत कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन

वाई : कॅन्सरचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार मिळावेत आणि समाजात कर्करोगाबाबत व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे “कर्करोगाचे लवकर निदान व जनजागृती शिबिर” तसेच “रोटरी रन २०२५” या उपक्रमांचे आयोजन शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे.

सकाळी ८ वाजता ‘रोटरी रन’ महागणपती मंदिर, वाई येथून सुरू होणार असून ही रॅली महागणपती मंदिर – घोटवडेकर हॉस्पिटल – शाहीर चौक – भगवा कट्टा – दातार हॉस्पिटल – किसनवीर चौक – मोठा पूल – छोटा पूल – महागणपती मंदिर अशा मार्गाने संपन्न होणार आहे. कॅन्सरचे प्राथमिक पातळीवर निदान होण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.

यानंतर सकाळी १०.३० वाजता सेंट थॉमस स्कूल, वाई येथे तनिष्का व रोटरी क्लब ऑफ वाई यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर जागृती व तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ब्रेस्ट, सर्व्हायकल, ओरल, ई.एन.टी. कॅन्सर या आजारांचे स्क्रिनिंग (तपासणी शिबिर) तसेच कॅन्सरविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे. या सर्व तपासण्या महिलांसाठी पूर्णतः मोफत असणार आहेत.

वाई शहर व तालुक्यातील महिलांनी या मोफत स्क्रिनिंग कॅम्पचा लाभ घ्यावा तसेच सर्व वाईकरांनी ‘रोटरी रन २०२५’ मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्वाती हेरकळ (माजी रोटरी प्रांतपाल ३१३२), रो. कुणाल शहा (अध्यक्ष) व अनुपम गांधी (सेक्रेटरी), रोटरी क्लब ऑफ वाई यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!