Thu, Jan 15, 2026
सामाजिक

वाईच्या गणपती घाटाची वयगावकरांकडून स्वच्छता; वाई तालुक्यासमोर आदर्श उपक्रम

वाईच्या गणपती घाटाची वयगावकरांकडून स्वच्छता; वाई तालुक्यासमोर आदर्श उपक्रम
Ashok Ithape
  • PublishedDecember 15, 2025

वाई प्रतिनिधी, वाई, दि. १३ : वाईनगरीचे भूषण असलेला ढोल्या गणपती आणि कृष्णा नदीचा पवित्र घाट हा भाविकांचा श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. दररोज असंख्य भक्तगण भक्तिभावाने या गणपतीचे दर्शन घेत असून कृष्णा घाटावरही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र गेल्या काही काळापासून घाट व परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते.

ही बाब लक्षात घेऊन वयगावकरांनी रविवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळच्या कडाक्याच्या थंडीत ढोल्या गणपती घाटाची व्यापक स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छता ही केवळ आपल्या गावापुरती मर्यादित न ठेवता, सर्वत्र पोहोचावी आणि घाणीच्या अंधकारातून मुक्ततेकडे वाटचाल व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.

सौ. रुपाली परीट यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली वयगावकरांनी एकत्र येत घाट परिसरातील कचरा, प्लास्टिक व घाण साफ करून परिसर स्वच्छ व सुंदर केला. या उपक्रमामुळे ढोल्या गणपती व कृष्णा घाटाचा परिसर पुन्हा एकदा पवित्र व रमणीय दिसू लागला आहे.

वयगावकरांनी राबवलेली ही स्वच्छता मोहीम वाई तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत असून, सामाजिक भान ठेवून नागरिकांनी एकत्र येऊन केलेले कार्य हे खऱ्या अर्थाने लोकसहभागातून स्वच्छतेचे उत्तम उदाहरण असल्याचे नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!