स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृती प्रतिष्ठान व स्पंदन हेल्थकेअरकडून वाईत सामाजिक सेवा पर्व
![]()
तालुकास्तरीय बाल चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर व आदर्श पालक-विद्यार्थी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
वाई, दि.५ : येथील स्व. दत्तात्रय पांडुरंग मेनबुदले स्मृती प्रतिष्ठान व स्पंदन हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी दि. ६ डिसेंबर रोजी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी रक्तदान शिबिर, तालुकास्तरीय बाल चित्रकला स्पर्धा तसेच सायंकाळी आदर्श पालक-विद्यार्थी पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे.
सकाळी ९.३० वाजता यशवंतनगर येथील आशा वृद्धाश्रम, वाई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्री. विजयकुमार परीट व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
याच दिवशी तालुकास्तरीय बाल चित्रकला स्पर्धा व तिचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्री. हर्षवर्धन मोरे व विस्ताराधिकारी श्री. साईनाथ वाळेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रभावी वक्ते व कथाकथनकार श्री. संजय कळमकर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत मठ संस्थानचे मठाधिपती श्री. ज्ञान भास्कर महादेव शिवाचार्य वाईकर महाराज राहणार आहेत.
सायंकाळी आदर्श पालक-विद्यार्थी पुरस्कार प्रदान सोहळा ३.३० वाजता साठे मंगल कार्यालय, वाई येथे होणार असून या सोहळ्यात श्री. अरुण सर्जेराव बाबर व श्री. तुषार अरुण बाबर, तसेच सौ. संगीता शिवराम मराठे, श्री. अशोक शिवराम मराठे व कु. श्रद्धा अशोक मराठे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सौ. सोनाली मेटकरी – शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, पोलीस निरीक्षक गडहिंग्लज कोल्हापूर अजयकुमार सिंदकर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी, आरोग्यजागृती व विद्यार्थ्यांमध्ये कला व संस्कारांची जोपासना होण्यास मोठी मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.













