Thu, Jan 15, 2026
देश विदेश

बेरोजगार उमेदवारांना इस्त्राईलमध्ये रोजगाराच्या संधी

बेरोजगार उमेदवारांना इस्त्राईलमध्ये रोजगाराच्या संधी
Ashok Ithape
  • PublishedDecember 4, 2025
सातारा, दि.४ –  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांअंतर्गत सातारा जिल्ह्यातील  उमेदवारांना इस्त्राईल देशामध्ये, Renovation Construction या क्षेत्रात रोजगाराची Ceramic Tiling (1000-जागा)) Ceramic Tiling (1000-जागा), Drywall Worker (300-जागा) व Mason (300-जागा) या पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे.
या रोजगारासाठी उमेदवारांची पात्रता इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान (Reading Writing and Speaking). 10 वी पास तसेच वय 25 ते 50 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अधिक माहिती व नोदणीसाठी https://maharashtrainternational.com  या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे, आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!