श्रीमती सुशिला बाबर यांचे निधन
वाई, दि. ४ : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वाई शाखेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पश्चिम महाराष्ट्रचे संघटक डॉ. सतीश बाबर यांच्या मातोश्री श्रीमती सुशिला बाजीराव बाबर (वय ८४) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. बाबर हॉस्पिटल ॲण्ड आयसीयू सेंटर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
समाजाबद्दल जिव्हाळा व सर्वांशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव यामुळे त्या परिसरात अत्यंत लोकप्रिय होत्या. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र – आदर्श माता’ पुरस्काराने ऑक्टोबर २०२४ मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रकाश सावंत यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या निधनाने बाबर कुटुंबावर शोककळा पसरली असून सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गुरुवारी सायंकाळी ज्योतिबाची वाडी (सायगाव), ता. सातारा, जि. सातारा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोयनानगर येथील सेवानिवृत्त मुख्य अभियंता चंद्रशेखर बाबर, सातारा येथील भुलतज्ज्ञ डॉ. सूर्यकांत बाबर तसेच वाई येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश बाबर यांच्या त्या मातोश्री होत.













