Mon, Mar 2, 2026
क्राईम न्यूज

अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री व वाहतूकीवर कारवाई.

अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री व वाहतूकीवर कारवाई.
Ashok Ithape
  • PublishedNovember 28, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून कारवाई

सातारा दि. 27 – आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, डॉ. राजेश देशमुख सो, मा. सहआयुक्त, (अ. व द.) प्रसाद सुर्वे सो. मा. विभागीय उपायुक्त, कोल्हापूर विभाग कोल्हापूर, विजय चिंचाळकर सो. तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा या कार्यालयाने मौ. करंजे, ता. जावली, जि. सातारा येथे सापळा रचून दि. 26 नोव्हेंबर २०२५ रोजी गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री करणारा आरोपी गणेश विष्णूदास धनावडे, वय वर्ष २८ वर्षे, रा. मौ. करंजे, ता. जावळी, जि. सातारा याचे ताब्यातून गोवा बनावटीचे परराज्यातील अवैद्य मद्य आणि देशी तसेच विदेशी मद्य व वाहतूकीसाठी वापरण्यात आलेले दुचाकी वाहन जप्त केले असून त्यास अवैद्य मद्य पुरवठा करणारा आरोपी इसम अतूल ज्ञानदेव धनावडे, वय २९ वर्षे, मुळचा रा. मौ. गवडी, ता. जावली, जि. सातारा. सध्या रा. मौ. बिरवडी, ता. महाड, जि. रायगड याचे ताब्यातून अवैद्य मद्य पुरवठा करण्याकरीता वापरण्यात आलेले दुचाकी वाहन जप्त केले आहे. वरील दोन्ही आरोपींच्या ताब्यातून गोवा बनावटीचे विदेशी मद्य व महाराष्ट्र राज्यातील विदेशी मद्य आणि देशी मद्यासह दोन दुचाकी वाहने असा एकूण २,५४,०६०/- (दोन लाख चोपन्न हजार साठ रुपये)  किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई मध्ये निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक  अजयकुमार पाटील व विजय मरोड आणि जवान, मनिष माने, सागर आवळे, अजित रसाळ यांनी सहभाग घेतला असून गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील हे करीत आहेत.

सातारा जिल्ह्यातील बेकायदा परराज्यातील मद्य, अवैद्य हातभट्टी मद्य निर्मीती व विक्री, ताडी निर्मीती व विक्री तसेच देशी, विदेशी मद्याची विक्री आणि वाहतूक होत असल्याचे निर्दशनास आल्यास त्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल  फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व व्हाटसअप क्रमांक- ८४२२००११३३ वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!