‘किसन वीर’ कारखान्यावर २६/११ मधील शहिदाना अभिवादन करून केले सविधानाचे वाचन
भुईंज : २६/११ हल्ल्यातील शहिद झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व निष्पाप नागरिकांना भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील शहिद स्मृती उद्यानात कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक प्रकाश धुरगडे, भुईज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक पोलीस फौजदार वैभव टकले,
कारखान्यातील सुरक्षा विभागातील सुरक्षा रक्षकांकडुन मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.
तसेच दरवर्षीं २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. संविधानाचे महत्त्व आणि त्याबहलची माहिती लोकांपर्यत पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. संविधानामुळे भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख मिळालेली आहे. संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केल्यानंतर म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आलेले होते. यावेळी संविधानाचे वाचन राजेंद्र निकम यांनी केले व त्याच्याबरोबर कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांनी संविधानाचे वाचन केले.













