Thu, Jan 15, 2026
राजकीय बातमीपत्र

परवीन मेमन यांना प्रभाग ४ मध्ये मतदारांचा वाढता जनाधार;

परवीन मेमन यांना प्रभाग ४ मध्ये मतदारांचा वाढता जनाधार;
Ashok Ithape
  • PublishedNovember 25, 2025

येणाऱ्या निवडणुकीत मेमन यांची ताकद अधिक बळकट होण्याचे संकेत

पाचगणी : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ४ मधून नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या परवीन मेमन यांना स्थानिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. प्रभागातील विविध वस्ती, परिसर व स्थानिक भागात घेतलेल्या संपर्क अभियानादरम्यान महिलांपासून तरुणांपर्यंत तसेच ज्येष्ठ नागरिकांतही मेमन यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे.

सामाजिक कार्य, सर्वसामान्यांना दिलेली सातत्यपूर्ण मदत, तसेच प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी सातत्याने केलेले प्रयत्न यामुळे परवीन मेमन यांच्याविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्वच्छता, पाणीपुरवठा, महिला सक्षमीकरण, रस्ते-विकास, आरोग्य सुविधा आणि युवकांसाठी उपक्रम राबविण्याचे आश्वासन मेमन यांनी आपल्या प्रचारादरम्यान दिले आहे.

प्रचाराच्या पहिल्या काही दिवसांतच मेमन यांना मिळणारा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता त्यांच्या उमेदवारीला आणखी गती मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!