वाई पालिकेच्या 22 जागांसाठी 61 उमेदवार मैदानात : 20 जनांची माघार
![]()
नगराध्यक्ष पदासाठी चौघांमध्ये लढत : एक नगरसेविका बिनविरोध. नगराध्यक्ष पदाच्या लढतीतून तेजपाल वाघ, प्रवीण शिंदे, विजय ढेकाणे यांची माघार.
वाई / प्रतिनिधी : येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकित अर्ज माघार घेण्याच्या दिवशी शुक्रवार दि. २१ रोजी अपक्षांसह सर्व पक्षीय २० उमेदवारांनी आपले निवडणूक अर्ज माघार घेण्यात आले, तर नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार रिंगणात असून २२ जागांसाठी ६१ उमेदवार नगरसेवक म्हणून निवडणूक लढविणार आहेत. पालिका निवडणुकीचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले असून प्रभाग नऊमधून राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीचे डॉ. नितीन कदम, भाजपचे अनिल सावंत, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदीप जायगुडे, व अपक्ष म्हणून दीपक जाधव निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.
महाविकास आघाडी कडून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे श्री. प्रदीप मारुती जायगुडे यांची नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तेजपाल वाघ यांनी आपली उमेदवारी पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून मागे घेऊन महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीतून वीस जणांनी शेवटच्या दिवशी त्यांचे अर्ज माघारी घेतले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तेजपाल वाघ, एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रवीण शिंदे, भाजपचे विजय ढेकाणे यांनी माघार घेतली. तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीतून प्रभाग २ ब मधून सुप्रिया सचिन पेटकर, गीता प्रशांत ढगे, प्रभाग ३ अ मधून चंद्रकांत गोकुळ वैराट, ब मधून सरिता हेमंत भोरे, आफरीन अली असगर शेख, प्रभाग ४ ब मधून अमोल दादासाहेब पवार, प्रभाग ६ ब मधून महेश रामचंद्र गायकवाड, अविनाश प्रताप लोखंडे, रुपेश सुधाकर जाधव, प्रभाग ७ अ मधून दिलीप भीमराव शिंदे, ७ ब मधून स्वप्नाली जयदीप शिंदे,
शुभदा प्रशांत नागपूरकर,
प्रभाग ८ ब मधून पूनम विकास जाधव, प्रतिभा दत्तात्रय हगवणे, प्रभाग ९ ब मधून शंकर दत्ता खरात, बापूराव साहेबराव खरात, प्रभाग १० अ मधून प्रणीता मयूर खरात, १० ब मधून रवींद्र हरिश्चंद्र भोसले, प्रभाग ११ अ मधून निलेश किशोर हेट्काळे यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.
वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप – शिवसेनेला आपले पॅनल पूर्णपण करता आलेले नाही. तर ना. मकरंद पाटील यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले सर्व उमेदवार रिंगणात उतरविले असून विरोधकांना एका प्रकारचा धक्का दिला आहे.
पालिका निवडणुकीमुळे ऐन हिवाळ्यात येथील राजकीय वातावरण तापले असून चित्र स्पष्ट झाल्याने प्रचाराला वेग येणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रचार करण्यासाठी मिळणारा कालावधी कमी असल्याने नेते व उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांची मोठी धावपळ होणार आहे.













