Thu, Jan 15, 2026
आरोग्य

जिल्हा रुग्णालयात कर्करोग तपासणी विभागाचा शुभारंभ

जिल्हा रुग्णालयात कर्करोग तपासणी विभागाचा शुभारंभ
Ashok Ithape
  • PublishedNovember 21, 2025
सातारा, दि.२१ –  जिल्हा रुग्णालय, सातारा येथे कर्करोग तपासणी बाहयरुग्ण विभागाचा शुभारंभ मा. याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या हस्ते व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या पुढाकाराने व पाठपुराव्याने करण्यात आला आहे. याचा फायदा जिल्हयातील अनेक गोर गरीब रुग्णांना होणार आहे.
कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास हा आजार पूर्ण बरा होतो. त्या साठीच्या तपासण्या, एक्सरे, सोनोग्राफि, CT Scan, बायोप्सी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असून कर्करोग तज्ज्ञ प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिस-या गुरुवारी ३० नं ओपीडी मध्ये सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत उपलब्ध असणार आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा रुग्णालयात मोफत किमोथेरपी देण्यात येणार आहे. याचा फायदा जिल्हयातील अनेक गोर गरीब कर्करोग ग्रस्त व कर्करोग संशयित रुग्णांना होणार आहे.
कृष्णा हॉस्पिटल व रिसर्च सेंटर कराड मधील कर्करोग विभाग प्रमुख डॉ. आनंद गुडूर यांच्या बहुमोल सहकार्याने आज जिल्हा रुग्णालय, सातारा येथे कर्करोग तपासणी बाहयरुग्ण विभाग सुरु झाला असून. त्याच्या शुभारंभासाठी कृष्णा वैदयकिय महाविदयालय कराडचे मेडिकल डायरेक्टर डॉ. कणसे, डॉ आनंद गुडूर व त्यांची टीम उपस्थित होती. प्रमुख अतिथ म्हणून मा. याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा, डॉ. काळे अधिष्ठाता, छत्रपती संभाजी महाराज शासकिय वैदयकिय महाविदयालय, सातारा, डॉ. युवराज करपे जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष कदम, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुंधती कदम, डॉ. राहुल जाधव, डॉ. चंद्रकांत काटकर, डॉ. प्रमा गांधी, डॉ. संजीवनी शिंदे रुग्णालयाचा सर्व स्टाफ व एनसीडी विभाग उपस्थित होता.
याप्रसंगी डॉ. युवराज करपे यांनी जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना आवाहन केले आहे की जे रुग्ण किमोथेरपीवर आहेत त्यांनी आपले सर्व रिपोर्ट व किमोथेरपी बाबतचे कागदपत्रे घेऊन या रुग्णालयातील एनसीडी विभागाशी संपर्क साधावा व या उपचाराचा लाभ घ्यावा. तसेच जे रुग्ण कर्करोग संशयित आहेत त्यांनी सदर ओपीडीच्या माध्यमातून आपले निदान निश्चीत करुन घ्यावे.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!