Thu, Jan 15, 2026
राजकीय बातमीपत्र

पाचगणी पालिकेत माजी पदाधिकाऱ्यांचे एकमेकांना आव्हान.

पाचगणी पालिकेत माजी पदाधिकाऱ्यांचे एकमेकांना आव्हान.
Ashok Ithape
  • PublishedNovember 20, 2025

नवे वारसदार करणार प्रवेश..पती पत्नीच्या जोड्याही निवडून येणार

विशेष प्रतिनिधी : सचिन ननावरे

पाचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेची निवडणूक ऐन रंगात आल्याने थंड पाचगणीचे वातावरण कमालीचे तापले आहे. माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर यांची, शेखर कासुर्डे, अनिता चोपडे, परवीन मेमन, किरण जानकर यांच्याशी अप्रत्यक्ष तर माजी उपनगराध्यक्ष दिलीप बगाडे संतोष कांबळे यांच्यात प्रत्यक्ष लढत होत असून नवे वारसदार पालिकेत प्रवेशासाठी सज्ज झाले आहेत.

पाचगणी नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष संतोष कांबळे, दिलीप बगाडे,या दिग्गजांसह सुनील बगाडे,दीपक कांबळे,विजय वन्ने, सुनील कांबळे,दास चावरिया,अमोल सावंत या ८ जणांनी रंगत आणली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दिलीप बगाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून सौ.कऱ्हाडकर यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे.

नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती साठी आरक्षित झाल्याने सौ.लक्ष्मी कऱ्हाडकर, शेखर कासुर्डे सौ परवीन मेमन, सौ अनिता चोपडे, किरण जानकर या माजी नगराध्यक्षाना अडचणीत आणणारे ठरले आहे. तर दिलावर बागवान, प्रवीण बोधे, राजश्री सणस, सुलभा लोखंडे, विनोद बिरामणे, नरेंद्र बिरामणे, आशा बगाडे, सौ.उज्वला महाडिक, सरोज कांबळे, या माजी उपनगराध्यक्षांना परत एकदा नगरसेवक होऊन सत्तेत जायचे आहे.

माजी उपनगराध्यक्ष संतोष कांबळे आणि दिलीप बगाडे हे दोघे थेट नगराध्यक्षपदासाठी मतदार राजाच्या दरबारात उतरले असून इतर 6 उमेदवारांचे आव्हान परतावून त्यांना यशश्री खेचून आणावी लागणार आहे.

या निवडणुकीत पाचगणीतील १० प्रभागातील २० जागांसाठी ऐकून ७८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी , तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होणार असे चित्र निर्माण झाले आहे.

प्रभाग 1 – अ) किरण जानकर, वैभव कऱ्हाडकर, पारस परदेशी ,संतोष कदम , ब )प्रतिभा धनावडे , प्रतीक्षा कासुर्डे, राजश्री सणस,
प्रभाग 2 अ) सुप्रिया माने, रेणुका कांबळे,सोनल घाडगे, ब) सुलभा लोखंडे, नरेंद्र बिरामणे,हरीश गोळे
प्रभाग 3 अ ) आकाश बगाडे, रुपेश बगाडे,अजय सपकाळ, विवेक परिहार, ब) अशा बगाडे, उषा भोसले, विमल भिलारे, आरती साळुंखे, प्रियांका जाधव, प्रीती आंब्राळे (शिवसेना)
प्रभाग 4 अ) परवीन मेमन, नम्रता बोधे
ब ) शेखर कासुर्डे, मंगेश उपाध्याय
प्रभाग 5 अ) उज्वला महाडिक, गायत्री कासुर्डे, राजश्री प्रभाळे, रेखा जानकर, शिल्पा माने, मेघना बाचल (bjp)
ब) सुनील बिरामने,अजित कासुर्डे, शहानवाज चौधरी, प्रसाद कारंजकर
प्रभाग 6 अ) माधुरी कासुर्डे,साधना कासुर्डे, प्रतीक्षा कासुर्डे, प्रियांका जायगुडे
ब ) गणेश कासुर्डे, भूषण बोधे, विनोद बिरामणे
प्रभाग 7 अ) लक्ष्मी कराडकर, अनिता चोपडे, नम्रता बोधे (भाजप) ब )राजेंद्र पारठे, प्रवीण बोधे
प्रभाग 8 अ) सचिन मोरे, नरेश लोहारा ,अमित कांबळे, सुनील खरात, किरण रणपिसे, रविराज देखणे, ब) अभिलाषा कराडकर, प्रीती पिसाळ, लक्ष्मी कराडकर, साबेरा सय्यद, रीना कांबळे
प्रभाग 9 अ)स्वाती कांबळे, आशा वन्ने, सुषमा मोरे,सरोज कांबळे, करुणा काकडे, सुचित्रा आव्हाडे,
ब ) प्रकाश गोळे, अर्जुन जेधे, जॉन जोसेफ ,रंजन कांबळे, हेन्री जोसेफ
प्रभाग 10 अ) योगेश जानकर, महेश खांडके, दिलावर बागवान, नामदेव चोपडे, ब ) शशिकला कासुर्डे, अमृता प्रकाश गोळे हे अर्ज वैद्य ठरले आहेत.

दुरंगी लढती : प्रभाग 7 अ मध्ये माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर व माजी नगराध्यक्षा अनिता चोपडे यांच्यात दुरंगी हाय हॉल्टेज लढत होत आहे.प्रभाग क्रमांक ४ मध्ये माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांना भाजपचे मंगेश उपाध्याय यांनी आव्हान दिले आहे.तर याच प्रभागातील ब गटात माजी नगराध्यक्ष परवीन मेमन यांना भाजपच्या नम्रता बोधे यांनी आव्हान दिले आहे. हा प्रभाग दोन्ही माजी नगराध्यक्षांचे होमग्राऊंड असल्याने उपाध्याय आणि सौ बोधे यांच्या आव्हानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रभाग ७ मध्ये माजी उपनगराध्यक्ष प्रवीण बोधे यांना राजेंद्र पारठे या उद्योजकाने आव्हान दिले आहे. पारठे यांची एकगठ्ठा मतदान या लढतीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये अमृता गोळे आणि शशिकला कासुर्डे यांच्यामध्ये दुरंगी लढती होत आहे. प्रकाश गोळे या युवा कार्यकर्त्याने आजवर केलेल्या समाजसेवेची पोहोचपावतीचा फायदा सौ.अमृता गोळे यांना होण्याची शक्यता आहे.

………………………………………………………….

तिरंगी लढती : क्रमांक ३ मध्ये माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र बिरामने,माजी उपनगराध्यक्ष सुलभा लोखंडे यांना युवानेते हरीश गोळे यांनी आव्हान दिले आहे.या तिरंगी लढतीत बिरामणे आणि गोळे यांचा निकाल लोखंडे लावणार आहेत.

प्रभाग ६ ब मध्ये माजी उपनगराध्यक्ष विनोद बिरामणे यांना गणेश कासुर्डे, भूषण बोधे यांनी आव्हान दिले आहे. दोन युवा चेहऱ्यांमुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक १ मध्ये दुसऱ्या लढतीत माजी उपनगराध्यक्ष राजश्री सणस यांच्यासमोर प्रतिभा धनावडे आणि प्रतीक्षा कासुर्डे यांनी आव्हान उभे केले आहे. अनुभवी सणस यात बाजी मारणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रभाग 2 अ मध्ये सुप्रिया माने, रेणुका कांबळे,सोनल घाडगे या नवख्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे.
प्रभाग क्रमांक ३ अ आणि ब या एकाच प्रभागातून रुपेश बगाडे आणि सौ आशा बगाडे हे पती पत्नी निवडणूक लढवत आहेत,तर प्रभाग १ अ मधून वैभव कऱ्हाडकर आणि प्रभाग क्रमांक ८ ब मधून सौ.अभिलाषा कऱ्हाडकर यांनी, प्रभाग क्रमांक ९ ब मधून प्रकाश गोळे अन १० ब मधून सौ.अमृता गोळे यांनी प्रभाग १ अ मधून किरण जानकर अन प्रभाग ५ या मधून सौ.रेखा जानकर या पती पत्नीनी निवडणूकीत अर्ज भरले आहेत. संतोष कांबळे आणि दिपक कांबळे हे सख्खे बंधू नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी आमने सामने उभे आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी यात काही प्रमाणात बदल होईल. पण तरीही पती पत्नीच्या किमान २ जोड्या तरी यावेळी पाचगणी नगरपालिकेत दिसतील.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!