Thu, Jan 15, 2026
कलाकार कट्टा

द व्हॉइस ऑफ अँटिक आयडल कराओके राज्यस्तरीय गायन स्पर्धेचे साताऱ्यात आयोजन

द व्हॉइस ऑफ अँटिक आयडल कराओके राज्यस्तरीय गायन स्पर्धेचे साताऱ्यात आयोजन
Ashok Ithape
  • PublishedNovember 17, 2025

नववर्षाच्या शुभमुहूर्तावर रंगणार मराठी हिंदी सदाबहार गाण्यांची संगीत मैफिल

सातारा / प्रतिनिधी

राजधानी सातारा येथे नववर्षाच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रविवार रोजी भव्य दिव्य राज्यस्तरीय कराओके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे.

सातारा मधील शाहू कला मंदिर या भव्य हॉलमध्ये द व्हॉइस ऑफ अँटिक आयडल या थीमच्या माध्यमातून विशाल अँटीक शॉपी तसेच अँटिक आयडल ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ चे मालक श्री विशाल निकम यांनी जानेवारी २०२६ मध्ये घेण्याचे ठरवले आहे, ह्या पार पडणाऱ्या कराओके गायन स्पर्धेतून बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

प्रथम विजेत्या गायकाला सातारा मधील तीस वर्षापासून विश्वसनीय असणारे शुद्ध, खात्रीशीर सोने चांदी विक्रेते, शुभम ज्वेलर्स यांच्याकडून २५००१ रु रोख बक्षीस मिळणार आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस हे १०,००१
रुपये इतके असणार आहे. तसेच ७००१ रुपये हे बक्षीस तृतीय क्रमांकास देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुमधुर गीत गाणाऱ्या गायकांवर देखील उत्तेजनार्थ बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.
प्रतियोगिते दिवशी हजर असणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा लकी ड्रॉ द्वारे भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी असणार आहे.लकी ड्रॉ द्वारे 3 विजेत्या प्रेक्षकांना विश्वसनीय पेढी शुभम ज्वेलर्स तर्फे चांदीच्या नोटा बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत.

ऑडिशनसाठी आणि या स्पर्धेत निवड होण्यासाठी 9850122773 ह्या मोबाईल नंबर वर नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

तसेच या कार्यक्रमाचे कुपन शुभम ज्वेलर्स येथे दाखवून प्रत्येक वेळी खरेदीवर ५० टक्के सवलत दिली जाईल.ही सवलत कायमस्वरूपी लागू राहील.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!