डॉ.जनार्दन भोसले यांना महाराष्ट्र भूषण राजस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान
वाई : वडूज तालुका खटाव येथील सौभाग्य मंगल कार्यालय येथे डीएसपी DSP न्यूज लाईव्ह चॅनलचा प्रथम वर्धापन दिन व महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या हस्ते बावधन ता वाई येथील साहित्यिक डॉ . जनार्दन पांडुरंग भोसले यांना महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच आरोग्य क्षेत्रात आरोग्य दूत, सामाजिक बांधिलकी, रुग्ण सेवा या कार्यसाठी शिवसेना उप शहर प्रमुख श्री राजाभाऊ भिलारे यांना महाराष्ट्रभूषण राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे भाऊ , DSP न्यूज Live चॅनेलचे संपादक श्री.दत्तात्रय फाळके , मराठी चित्रपट सूड शकारंंभ टिम, पिचली माझी बांगडी फेम गायत्री साळवे, रडू नको बाळा फेम बालगायिका ह.भ.प शिवानीताई शिंदे, महाराष्ट्रातील उत्कृष्ट लेडी डीजे ऑपरेटर वैभवी कांबळे उर्फ डीजे छकुली, भाजप जेष्ठ मार्गदर्शक बंडा गोडसे, भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी, वडूज पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, भाजप खटाव तालुका माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.













