Mon, Mar 2, 2026
पर्यावरण

मौजे वयगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा ६.० अंतर्गत पर्यावरणपूरक हरित दीपावली साजरी

मौजे वयगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा ६.० अंतर्गत पर्यावरणपूरक हरित दीपावली साजरी
Ashok Ithape
  • PublishedNovember 2, 2025

वाई : मौजे वयगाव ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा ६.० अभियानाच्या अनुषंगाने गुरुदत्त मंदिर परिसरात पर्यावरणपूरक हरित दीपावली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर, फटाक्यांवर बंदी, तसेच विद्युत रोषणाईऐवजी पारंपरिक दिव्यांद्वारे प्रकाशाचा संदेश देणे हा होता.वयगाव ग्रामस्थांनी पारंपरिक दिव्यांच्या प्रकाशात दीपोत्सव साजरा करून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार विविध शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
यामध्ये श्रावणबाळ योजना, अपंग लाभार्थी, विधवा महिला, एक पालकत्व असलेले लाभार्थी, दोन मुली असलेले कुटुंब, पी.एम. किसान योजना, तसेच आयुष्यमान भारत कार्डपासून वंचित असलेले नागरिक यांचा समावेश होता. संबंधित लाभार्थ्यांची यादी तयार करून फॉर्म भरण्याचे व लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले.

समाजातील स्त्रियांचे प्रमाण घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर लिंग गुणोत्तर संतुलनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘कन्या पूजन’ आयोजित करण्यात आले. या प्रसंगी व्याहळी कॉलनी गावच्या पी.एस.आय. कु.प्राची विजय थोरवे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरे व पत्रकार प्रशांत थोरवे सर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच वसुंधरा सिक्सर झिरो उपक्रमाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. नागरिकांनी हरित दीपावली, स्त्री-समानता व शासन योजनांबाबत जागरूकतेचा संकल्प व्यक्त केला.
“स्वच्छता, हरितता आणि समानता — हाच मोजे वयगाव ग्रामपंचायतीचा दीपोत्सवी मौलिक संदेश दिला.”

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!