Thu, Jan 15, 2026
क्रीडा

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे विद्यालयातील तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे विद्यालयातील तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड
Ashok Ithape
  • PublishedOctober 31, 2025

रत्नागिरी: महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पंधराव्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर डॉजबॉल स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचा मुली व मुलांचा संघ पुण्यातील पिंपरी चिंचवड हिंदुस्थान अँटीबायोटीक स्कूल खराळवाडी येथे सहभागी झाला होता.

या दोन्ही संघांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी उत्तम काम केलेल्या केलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचा पूजन रमेश धातकर मुलांच्या संघात तर मुलींच्या संघात नंदिनी रवींद्र जाधव व धनश्री नारायण बळकटे यांची निवड झालेली आहे. या राष्ट्रीय स्पर्धा 14 ते 17 नोव्हेंबर रोजी गुजरात येथे होणार आहेत. या प्रशालेतील आतापर्यंत अनेक खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले आहेत.

ग्रामीण भागातील या शाळेने उत्तम दर्जाचे खेळाडू तयार केलेले आहेत.या खेळाडूंना क्रीडाशिक्षिका सौ.ऋतुजा जाधव यांनी मार्गदर्शन केले.या निवड झालेल्या स्पर्धकांना मुख्याध्यापक विलासराव कोळेकर व संस्था अध्यक्ष माद्रे साहेब,सचिव रुमान पारेख सर्व संचालक, शिक्षक, पालक संघ यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!