वाई येथे दिशा अकॅडमीची ‘स्कोर बूस्टर कार्यशाळा
![]()
‘दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या तयारीला मिळणार नवी दिशा

वाई, दि. ३० ऑक्टोबर : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेपूर्वीची तयारी अधिक प्रभावी व्हावी आणि त्यांच्या गुणांमध्ये लक्षणीय वाढ व्हावी या उद्देशाने दिशा ग्रुप ऑफ एज्युकेशन (बारामती सातारा) तर्फे वाई येथे दोन दिवसीय “स्कोर बूस्टर कार्यशाळा २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, १ आणि २ नोव्हेंबर २०२५ रोजी कल्पतरू हॉल, ढगेआली, वाई येथे पार पडणार आहे.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना परीक्षेसाठी आवश्यक असलेले अचूक मार्गदर्शन करणे हा आहे. कार्यशाळेतील प्रमुख मार्गदर्शन सत्रे : कार्यशाळेत दहावीच्या सर्व विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. यात प्रामुख्याने खालील विषयांवर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल:
•बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्नप्रकार: परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रश्नांचा सराव.
•उत्तरपत्रिका लेखनपद्धती: जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी उत्तरपत्रिका कशी लिहावी, याचे मार्गदर्शन.
•प्रभावी रिव्हिजन तंत्र: कमी वेळेत संपूर्ण अभ्यासक्रम प्रभावीपणे कसा उजळावा यासाठीचे तंत्र.
•वेळ व्यवस्थापन: परीक्षेदरम्यान वेळेचे योग्य नियोजन कसे करावे.
तज्ज्ञ मार्गदर्शक: या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्य बोर्डाचे तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत, ज्यात खालील मान्यवरांचा समावेश आहे:
विषय मार्गदर्शक गणितडॉ. दिलीप देशमुख, विज्ञान डॉ. सुलभा विधाते, इतिहास प्रा. डॉ. शिवानी लिमये इंग्रजीडॉ. श्रुती चौधरी,
विशेष करियर मार्गदर्शन सत्र:कार्यशाळेच्या निमित्ताने पालक आणि विद्यार्थ्यांसाठी डॉ. नितीन कदम सर (संस्थापक अध्यक्ष, दिशा ग्रुप ऑफ एज्युकेशन) यांचे “करियर मार्गदर्शन सत्र” आयोजित करण्यात आले आहे. हे सत्र विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यास मदत करेल.प्रवेश आणि सुविधा:
•अनिवासी प्रवेश: विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत असेल.•निवासी प्रवेश: यासाठी नाममात्र ₹२०० शुल्क आकारले जाईल.
•कार्यशाळेच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
•याशिवाय, “अकॅडमी टॉपर्स यशकथा संवाद सत्र” देखील आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी अनिवासी प्रवेश पूर्णतः मोफत असून, निवासी प्रवेश (भोजन सुविधेसह) करिता केवळ ₹२००/- प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे.
जिथे यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, अभ्यासातील शिस्त आणि उत्कृष्ट गुणांच्या दिशेने प्रेरणा निर्माण होण्यासाठी ही कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास दिशा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नितीन कदम सर यांनी व्यक्त केला आहे. या महत्त्वाच्या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन दिशा अकॅडमी, वाई शाखा तर्फे करण्यात आले आहे.













