आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते रामचंद्र काळे यांचा सत्कार
फलटण / प्रतिनिधी- वडले ता फलटण येथील रहिवाशी व सातारा एसटी आगारातील लेखाकार रामचंद्र काळे यांचा नुकताच आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री रामचंद्र काळे यांना नुकताच डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार व विश्वकर्मा राज्यस्तरीय गुणवंत कामगार भूषण पुरस्कार मिळाला असून राज्य परिवहन आगारातील कर्तव्य बजावतानाच साहित्य संस्कृती क्षेत्रात त्यांनी विशेष योगदान दिले आहे. दरम्यान स्मृतींचे पिंपळपान हा कवितासंग्रह त्यांनी नुकताच प्रकाशित केला आहे.
पुरस्कारांबरोबरच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल फलटणया कोरेगाव मतदार संघाचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते नुकतेच त्यांना फलटण येथे गौरवण्यात आले.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबाजी काळे व फलटण तालुक्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामचंद्र काळे यांनी स्मृतींचे पिंपळपान हे पुस्तक आमदार पाटील यांच्यासह मान्यवरांना भेट दिले. फलटण तालुक्याचे नाव प्रशासकीय सेवा व साहित्य क्षेत्रात आणखी उंच करण्यासाठी रामचंद्र काळे यांचे भरीव योगदान राहो, अशा शुभेच्छा आमदार पाटील यांनी यावेळी दिल्या.













