Thu, Jan 15, 2026
साहित्य

पद्मश्री शाहीर साबळे स्मृती स्मारकाचे रविवारी एकसरला कोनशीला अनावरण

पद्मश्री शाहीर साबळे स्मृती स्मारकाचे रविवारी एकसरला कोनशीला अनावरण
Ashok Ithape
  • PublishedOctober 25, 2025

ना. अजितदादा पवार यांच्यासह जिल्ह्यातील मंत्र्यांची उपस्थिती स्वागताध्यक्ष ना. मकरंदआबा पाटील यांची माहिती

वाई / प्रतिनिधी : “जय जय महाराष्ट्र माझा…” या राज्य गीतासह विविध लोकगीतांतून समाज जागृती करणारे ज्येष्ठ लोककलावंत आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र पद्मश्री शाहीर साबळे यांच्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त त्यांच्या स्मृती स्मारकाचे भूमिपूजन व संकल्प कोनशीला अनावरण समारंभ रविवार, दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता मौजे एकसर, ता. वाई येथे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते व जिल्ह्यातील विविध मंत्र्यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष ना. मकरंदआबा पाटील यांनी दिले आहे.

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीनकाका पाटील, जेष्ठ नेते उल्हासदाद पवार, पुसेगावच्या श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात प्रा. डॉ. प्रकाश खांडगे लिखित शाहीर साबळे यांच्यावरील चरित्र ग्रंथ आणि कलास्पर्श स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे. याशिवाय विविध मान्यवर कलावंतांनी शाहीर साबळे यांना लोकगीतांच्या सादरीकरणातून वाहिलेली मानवंदना हा विशेष कार्यक्रमही यावेळी होणार आहे. पुणे विभाग पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे व साताऱ्यातील नियोजित 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष ना मकरंदआबा पाटील, शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या मुख्य विश्वस्थ राधाबाई साबळे, अध्यक्ष श्री. राजाराम निकम, सचिव श्री संजय साबळे, विश्वस्थ श्री. उत्तम नागमल, श्री. दत्तात्रय मर्ढेकर, श्री. सुरेश नरुटे, श्री. नारायण डी. वरे, श्री. श्रीधर जगताप, मिडिया पार्टनर संकल्प न्यूज माध्यम समूह, पसरणी व एकसर ग्रामस्थ आणि संकल्प कोनशिला अनावरण समारंभ संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!