पद्मश्री शाहीर साबळे स्मृती स्मारक भूमिपूजन सोहळा २६ ऑक्टोबर रोजी वाई तालुक्यातील एकसर येथे होणार संपन्न
![]()
शाहीर साबळे स्मारकाच्या कोनशीला अनावरण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू
वाई, दि. २१ : महाराष्ट्राचे लाडके लोककलावंत, ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाचे जनक, शाहीर साबळे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा येत्या २६ ऑक्टोबर २०२५ रोजी वाई तालुक्यातील मौजे एकसर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या सोहळ्याला राज्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार हे कोनशिला अनावरण समारंभाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष म्हणून विधान परिषदेचे सदस्य, आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील हे जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
शाहीर साबळे यांनी आपल्या कलेने महाराष्ट्राच्या लोककला परंपरेला एक नवा आयाम दिला. त्यांच्या कार्याची दखल म्हणून उभारण्यात येणारे हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या भूमिपूजन सोहळ्यासाठी परिसरातील नागरिक आणि शाहीर साबळे यांच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या लोककला परंपरेतील अग्रगण्य व्यक्तिमत्व पद्मश्री शाहीर साबळे यांच्या स्मारकाच्या कोनशीला अनावरण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
मौजे एकसर, ता. वाई, जि. सातारा येथील पद्मश्री शाहीर साबळे प्रतिष्ठान येथे रविवार दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी हा भव्य सोहळा पार पडणार असून, या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांमध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. ना. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा मध्यवर्ती बँक, साताराचे अध्यक्ष मा. खासदार श्री. नितीनकाका पाटील, तसेच मा. अध्यक्ष उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ मा.श्री. उल्हासदादा पवार यांचा समावेश आहे.
कार्यक्रमास साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्री. सदानंद मोरे यांची तसेच, श्री. सेवागिरी देवस्थान, पुसेगावचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्यात पत्रकार अधिस्वीकृती समिती, पुणे विभागाचे अध्यक्ष श्री. हरीश पाटणे आणि ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष, श्री. विनोद कुलकर्णी, यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
संयोजन समिती, संकल्प कोनशीला अनावरण सोहळा २०२५ हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. ‘संकल्प न्यूज माध्यम समूह’ हे या सोहळ्याचे मिडिया पार्टनर आहेत.
स्थळ: पद्मश्री शाहीर साबळे प्रतिष्ठान, मौजे एकसर, ता. वाई, जि. सातारा. वेळ सकाळी 9.30













