एकसरचे युवा नेतृत्व मयूर कमलाकर चव्हाण : संघर्षातून साकारलेली विकासाची यशोगाथा
![]()
२४ व्या वर्षी सरपंचपदाची धुरा सांभाळत, कमलाकर चव्हाण यांनी एकसर गावाचे भाग्य उज्वल केले; पश्चिम भागाचा सन्मान वाढवला.
वाई: एकसर गावचे युवा नेतृत्व, सरपंच मयूर कमलाकर चव्हाण (पाटील), यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी सरपंचपदाची धुरा सांभाळत एकसर गावाच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. एका गरीब कुटुंबातून येऊन, वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही त्यांनी घर आणि गाव दोन्हीची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांच्या या संघर्षातूनच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख निर्माण झाली.
सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, श्री. चव्हाण यांनी एक आदर्श सरपंच म्हणून स्वतःला सिद्ध केले. त्यांनी गावच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आणि प्रत्येक कामाचा पाठपुरावा अत्यंत प्रामाणिकपणे केला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाण्याच्या टाकीचा प्रश्न त्यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मार्गी लावला. या कामासाठी त्यांनी कित्येक महिने अथक परिश्रम घेतले, ज्याला अखेर यश मिळाले.
अशा अनेक विकासकामांना त्यांनी पूर्णत्व दिले, ज्यामुळे गावाच्या प्रगतीला गती मिळाली. गावच्या विकासासाठी त्यांनी कधीच माघार घेतली नाही आणि गावातील प्रत्येक नागरिकाला सोबत घेऊन त्यांनी विकासाची गंगा आणली. विकासकामांमध्ये अनेक अडथळे आले, परंतु त्यांनी प्रत्येक संघर्षावर मात केली. हळूहळू त्यांनी आपले कार्यक्षेत्र पश्चिम भागापर्यंत विस्तारले आणि तालुक्यातही आपली वेगळी छाप उमटवली.
आज संपूर्ण गावाला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. श्री. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम भागाचा आणि एकसर गावाचा विकास अधिक गतिमान होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. ‘ज्याचं संपूर्ण समर्पण असतं, त्याला श्री काळभैरवनाथाचं सुद्धा समर्थन असतं’ या उक्तीप्रमाणे, श्री. मयूर कमलाकर चव्हाण (पाटील) यांच्या पुढील वाटचालीस सर्व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत.













