Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

‘आम्ही सातारकर फौंडेशन’च्या दसरा मेळाव्यात गुणवंतांचा सत्कार

‘आम्ही सातारकर फौंडेशन’च्या दसरा मेळाव्यात गुणवंतांचा सत्कार
Ashok Ithape
  • PublishedOctober 18, 2025

अप्पर पोलीस महासंचालक तुकाराम चव्हाण यांच्या हस्ते कु. समिक्षा भोसले हिच्या वडिलांचा सत्कार

पुणे, दि. १४: ‘आम्ही सातारकर फौंडेशन’ पुणे यांच्या वतीने आयोजित दसरा मेळाव्यात बावधन, ता. वाई, जि. सातारा येथील कु. समिक्षा जनार्दन भोसले हिचा सत्कार तिचे वडील डॉ. जनार्दन भोसले यांच्या वतीने करण्यात आला. १२ वीच्या सीईटी परीक्षेत ९१.५० गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल समिक्षाचा हा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. अप्पर पोलीस महासंचालक श्री. तुकाराम चव्हाण होते, तर राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष श्री. यशवंत भाऊ भोसले अध्यक्षस्थानी होते.यावेळी व्यासपीठावर अर्जुन पुरस्कार विजेत्या श्रीमती शकुंतला खटावकर, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार श्रीमती शोभना पंडित आणि उद्योजक श्री. सुशील मोझर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे शहरात राहणाऱ्या सर्व जिल्हावासियांना एकत्र आणून रोजच्या धकाधकीच्या जीवनात एक आनंदोत्सव साजरा करणे हा या दसरा मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.याच कार्यक्रमात उमेश माने, मनोज पिंगळे, बाळासाहेब पवार, सदाशिव पवार, स्वाती थोरात, संभाजी पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना ‘सातारा भूषण’, ‘सातारा रत्न’, ‘यशवंत उद्योजक’, ‘अजिंक्यतारा’ व ‘नवदुर्गा’ यांसारख्या विविध पुरस्कारांचे दिमाखात वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाजीराव पाटील, सांज बोत्रे, राजेंद्र यादव, सातारा जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्य आणि अनेक उद्योजकांचे सहकार्य लाभले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!