दुर्गोत्सव साजरा करण्याची संहिता व वेळापत्रक दुर्गोत्सवाची गरज
सातारा, दि. १५ : बदलत्या काळाबरोबर झपाट्याने बदलणाऱ्या आपल्या समाजातील काही पारंपरिक व सांस्कृतीक रुढी लोप पावत चालल्या आहेत. दीपावली सणाच्या कालावधीत, मिळेल त्या जागेत, लहान थोरानी मिळून दुर्गाच्या प्रतिकृती बनवण्याची प्रथा ही आपल्या संस्कृतीशी निगडीत आहे. एक अभूतपूर्व अशी प्रथा प्रोत्साहनाअभावी नाहीशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बालगोपाळांच्या सहभागाने आपला इतिहास जिवंत करत महानायक शिवछत्रपतींना मानवंदना देणारा हा दुर्गोत्सवाचा उपक्रम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून अशा स्वरूपाचा उपक्रम जगात कुठेही साजरा केला जात नाही.
जनसर्वेक्षणातून निदर्शनास आलेली काळजीची बाब म्हणजे जर कुठलेही प्रोत्साहन मिळाले नाही तर ही अफलातून परंपरा नामशेष होण्याची भीती आहे. यूनेस्को ने याच वर्षी छत्रपतींच्या बारा दुर्गांना जागतिक वारसा वास्तु असे प्रमाणित करत वैश्विक ख्याती मिळवून दिली, त्यामुळे या उपक्रमाला प्रोत्साहन देणाऱ्या लोकचळवळीचा श्री गणेशा करण्यासाठी ही वेळ अतिशय संयुक्तिक ठरते. अमृतच्या पुढाकारातून महाराष्ट्र शासनाने आता महाराष्ट्रातील सर्व जनतेला या वैश्विक ख्याती प्राप्त शिवछत्रपतींना मानवंदना मानवंदना देण्यासाठी म्हणून दुर्गोत्सव हा लोकोत्सव साजरा करण्याचे निश्चित केलेले आहे.
संकल्पना : राज्यातील सर्व जनतेने अगदी जमेल तेथे या वैश्विक ख्याती प्राप्त असलेल्या व युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केलेल्या या 12 दुर्गाच्या हुबेहूब प्रतिकृती बनवाव्यात. (१२ दुर्ग-रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग)
राज्यातील नागरिकांनी घरातील अंगणात, गृहसंकुलातील सार्वजनिक जागांमध्ये, बागेमध्ये, बाल्कनीत परिवारातील / कुटुंबातील सर्वांनी मिळून वरीलपैकी कोणत्याही एका दुर्गाची उत्तम सजावटीसह प्रतिकृती बनवाव्यात.
अमृत संस्थेने खास दुर्गोत्सवासाठी बनवलेल्या (digital platform https://www.durgotsav.com/) व्यासपीठावर दुर्गोत्सवात बनविलेल्या दुर्गासोबत सेल्फी फोटो काढून हा फोटो अपलोड करावा. त्यासाठी संबंधित फॉर्म भरताना स्वतःचे नाव आणि इतर तपशील नमूद करावा.
दुर्गाचा फोटो अपलोड केल्यानंतर फोटोची वैधता / सत्यता पडताळणी अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
अपलोड केलेल्या फोटोची वैधता, सत्यता सिद्ध झाल्यानंतर, भाग घेणाऱ्या प्रत्येकास शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे “अभिनंदन पत्र” digital स्वरूपात, वैधता पडताळणीनंतर २४ तासांत. https://www.durgotsav.com/ या संकेतस्थळावरुनच डाउनलोड करून घेता येईल. (सदारची लिंक मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दुर्गोत्सवात सहभाग घेणाऱ्यांना मिळणारे लाभ
मुख्यंमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे डिजिटल स्वरुपातील “अभिनंदन पत्र “
“शिवचरित्रातुन आज घ्यावयाचे धडे “ या विषयावरील उत्कृष्ट अशा डिजीटल स्वरुपातील म्हणजेच ऑडियो आणि व्हिडीओ स्वरुपातील निशुल्क उपलब्ध हेाईल.
सोहळयाचे वेळापत्रका बारा ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत नोंदणी https:durgotsav.com येथे करावी.
विश्र्वविक्रम प्रमाणपत्र स्वीकारण्याच्या सोहळयाचा कार्यक्रम दहा नोव्हेंबर शिवप्रताप दिन या दिवशी असेल.













