Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा

जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर

जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर
Ashok Ithape
  • PublishedOctober 7, 2025

सातारा दि. 7 : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील सभापती पदासाठी आरक्षण सोडत घेण्यात आली . त्यानुसार ११ पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण सोडतीव्दारे प्रवर्गनिहाय निश्चीत करण्यात आले होते. त्याचा तपशील खालीलप्रमाणे.

खटाव पंचायत समिती-अनुसुचित जाती महिला प्रवर्ग, फलटण पंचायत समिती- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कोरेगांव पंचायत समिती-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, महाबळेश्वर पंचायत समिती-नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला), खंडाळा पंचायत समिती-सर्वसाधारण महिला प्रवर्ग, पाटण पंचायत समिती-सर्वसाधारण महिला प्रवर्ग, कराड पंचायत समिती-सर्वसाधारण महिला प्रवर्ग, जावली पंचायत समिती- सर्वसाधारण प्रवर्ग, वाई पंचायत समिती- सर्वसाधारण प्रवर्ग, माण पंचायत समिती- सर्वसाधारण प्रवर्ग व सातारा पंचायत समिती -सर्वसाधारण प्रवर्ग या प्रमाणे पंचायत समिती सभापतींचे आरक्षण निश्चीत झाले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!