‘किसन वीर’ चे गतवैभव परत मिळवणारच ; नामदार मकरंदआबा पाटील
![]()
‘किसन वीर’ साखर कारखाना भुईंज बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न
वाई, दि.३ : कारखान्याचे संस्थापक देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांनी या कारखान्याची उभारणी केली. आतापर्यत झालेल्या सर्व चेअरमन व संचालकांनी कारखान्याच्या उन्नतीसाठी अतोनात प्रयत्न केले व कारखाना नावारूपाला आणलेला होता. परंतु मध्यंतरीच्या कालखंडात कारखाना कसा चालविला आणि काय दशा झाली, हे आपणा सर्वांना माहित आहेच. लयाला गेलेला कारखाना आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव ताब्यात घेतला व ऊस उत्पादकांच्या पाठींब्यावर आपण मागील तीन गळित हंगाम यशस्वी केले असून येणाऱ्या गळित हंगामात व्यवस्थापनाने डोळयासमोर ठेवलेले किसन वीर व खंडाळा कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. दोन ते तीन गळित हंगाम यशस्वी झाल्यास किसन वीरचे गतवैभव परत मिळवणारच असा ठाम विश्वास राज्याचे मदत व पनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील यांनी व्यक्त केला.
किसन वीर कारखान्याच्या ५५ व्या बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभप्रसंगी ते बोलत होते बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ नामदार मकरंदआबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते संपन्र झाला. यावेळी व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, बुलढाणा राष्ट्रवादी कॉग्रेसचे उपाध्यक्ष शंतनु बोंद्रे, दत्तानाना ढमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती
नामदार पाटील पुढे म्हणाले की, राज्यामध्ये झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे झालेले नुकसान यासाठी मंत्रीमंडळाची मिटींग असल्यामुळे मला कारखान्याच्या वार्षिक मिटींगला उपस्थित राहता आले नाही. वार्षिक मिटींगला सभासदांची उपस्थिती लक्षणीय होती, ही गौरवाची बाब आहे. किसन वीर व खंडाळा कारखाना ताब्यात घेण्याबाबत दोन मतप्रवाह होते. परंतु शेतकरी व कामगांच्या आग्रहास्तव कारखाने ताब्यात घेतले. मागील व्यवस्थापनानेच सभासद केलेले होते तरीसुद्धा आपल्याला जवळपास ७० टक्के मतदान झालेले होते. यावरूनच आपणांस कळते की, मागील व्यवस्थापन किती कामाचे होते. त्यांनी फक्त स्वतःचे खिसे भरण्याचे काम केले. राजकीय निर्णयही का बदलावा लागला ते आपणां सर्वाना माहिती आहेच, त्यामुळे आपल्याला ४६७ कोटी रूपयांची मदत झाली. या मदतीमुळेच आपण बँकांची कर्जे भागवु शकलो व उर्वरित बँकांचीही कर्जे लवकरच भागविली जाणार आहेत. इतर कारखान्यांप्रमाणे आपणही ऊस दर दिलेला आहे. मागील तीन हंगामातील शेतकरी, व्यापारी, शासकीय देणी व इतर सर्व देणी देण्यात आपण यशस्वी झालेलो आहेत, ते ही विना अर्थसहाय्य घेता. त्यामुळे यापुढील काळात दोन ते तीन हंगामामध्ये दोन्ही कारखान्यामध्ये पुर्ण क्षमतेने गाळप होणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही कारखाने कर्जमुक्त होणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये किसन वीरचा दर हा सर्वोत्तम राहणार आहे, याबाबत सभासदांनी निश्चित राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. सहकारी साखर कारखाने मोडीत जाऊन खाजगीकरणाचे पेव वाढत चालले आहे. सहकारी साखर कारखानदारी वाचविण्याचे काम आपल्या सर्वांना करावयाचे आहे यासाठी सर्व सभासद व बिगर सभासदांनी आपला पिकविलेला चांगल्या प्रतीचा संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच गळितासाटी पाठविण्याचे आवाहन करून सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा नामदार पाटील यांनी दिल्या.
प्रमोद शिंदे म्हणाले की, किसन वीर खंडाळा हे दोन्ही कारखाने गळितासाठी सज्ज असून तोडणी यंत्रणाही पुर्ण क्षमतेन भरलेली आहे. आमची १५ ऑक्टोबरपासूनच दोन्ही कारखाने सुरू करण्याची तयारी होती. परंतु शासनाने १ नोव्हेंबरपासन हंगाम सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. कारखान्याच्री आर्थिक अडचणी मिटविण्याचे काम नामदार मकरंदआबांनी केलेले आहे. शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्याला गळितासाठी देण्याबावत शिंदे यांनी आवाहन केले. संभाजी कदम व सौ. पुष्पा कदम (मालगांव), हंबीरराव कदम व सौ. वैशाली कदम (देऊर), राेंद्र शिंदेव सौ. उज्वला शिंदे (आखाडे), रविंद्र इथापे व सौ. रंजना इथापे (चिंधवली), शंकर भातुसे व सौ. सुवर्णा भातुसे (गुळुंब) या उभयतांच्या हस्ते बॉयलरचे पुजन करण्यात आहे. या उभयतांचा सत्कार नामदार मकरंदआबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, प्रतापराव पवार, महादेव म्हस्कर, मनिष भंडारे, सत्यजीत वीर, वाळासाहेब वीर, मंगेश धुमाळ, ज्ञानोबा शिंगटे, रामभाऊ लेंभे, आत्माराम सोनावणे, मदन भोसले, शशिकांत पवार, राजेंद्र सोनावणे, कांतीलाल पवार, बबनराव साबळे, मानसिंग साबळे, अरविंद कदम, अजय कदम, ॲड. उदयसिंह पिसाळ, शशिकांत भोईटे, सुर्यकांत बर्गे, संपतराव वाघ, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकतं, कारखान्याचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
नामदार मकरंदआबांना त्यांच्या स्वभावाप्रमाणे खाते मिळाले – प्रमोद शिंदे
मकरंदआबांचा स्वभाव हा कायम उदारमतवादी आहे. त्यांच्याकडे गेलेला कोणताही कार्यकर्ता रिकाम्या हाताने येत नाही. प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या काळात त्यांनी रात्र बघितली नाही व दिवसही बघितला नाही, फक्त मदत झाली पाहिजे, हेच त्यांच्या स्वभावात आहे. त्यांनी केलेल्या कामाचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर कायम दिसून येते. त्यामुळेच राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांची मदत व पुनर्वसन मंत्री म्हणुन वर्णी लागलेली आहे. मदत करण्याच सामर्थ्य त्यांच्याच असल्यामुळे स्वभावाप्रमाणेच त्यांन खाते मिळाल्याचे प्रमोद शिंदे यांनी अभिमानाने सांगितले.
४६७ कोटीचे मदत मिळताना पुर्ण दिवस आमच्यासह सर्व अधिकारीही उपाशी होते-नामदार मकरंदआबा पाटील
किसन वीर व खंडाळा कारखान्याला ज्यावेळी ४६७ कोटीची मदत जाहिर झाली होती. परंतु काही कागदपत्रांअभावी ही रकम मिळालेली नव्हती. त्याचदिवशी निवडणुक आयोगानी लोकसभेकरिता प्रेस घेतलेली होती. त्यामुळे काहीही करून त्यादिवशी सर्व कागदपत्रांवर सह्या होऊन जीआर निघणे गरजेचे होते. मी स्वतः सहा ते सात सह्या चार मिनीटांत संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या होत्या. सर्व सोपस्कर होऊन ज्यावेळी जीआर निघाला. त्यावेळी माझ्यासह सर्व अधिकाऱ्यांना घेऊन नाष्टा करावयास गेलेलो होतो. त्यादिवशी सह्या झाल्या नसत्या तर ही मदत आपल्याला वेळेवर मिळाली नसती. कारखाना वाचविण्यासाठी किती कष्ट केले आहेत याचे फक्त एकच उदाहरण सांगितले असेही नामदार पाटील यांनी सांगितले.













