युवक युवतींना जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
सातारा दि. 17: जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायीक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगातील २३ वर्षाखालील तरुण-तरुणींकरीता त्यांच्यातले कौशल्य सादर करण्याची स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवरती करुन निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. २०२६ मध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने ६३ क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कॉसिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत युवक युवतींनी भाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्याकरीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. सहभागासाठी उमेदवारांचा जन्म १ जानेवारी २००४ किवा नंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच डिजीटल कन्स्ट्रक्शन, क्लाउड कंम्प्युटींग, सायबर सिक्युरिटी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, अॅडीटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्रीअल डिझाइन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री ४.०, ऑप्टोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलोजी, रोबोट सिस्टम इंटेग्रेशन, मॅकेट्रॉनिक्स, वॉटर टेक्नॉलॉजी, डेंटल प्रोस्थेटीक्स, एअरक्राफट मेंटेनन्स, इ. क्षेत्रांकरीता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००१ किंवा नंतरचा असणे अनिवार्य आहे. सर्व शासकीय / खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), सर्व अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औषध निर्माण शास्त्र, नर्सिंग महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था खाजगी तसेच शासकीय कौशल्य विद्यापीठ, Flower Training Institutes, Institute Of Jewelry making, सर्व प्रशिक्षण संस्था यातील प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी यांना सदर स्पर्धेत सहभागी होता येईल.
जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ करीता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबरपर्यंत https://www.skillindiadigital.













