भुईंजची ‘रेवा’ थेट इस्त्रोत, ग्रामीण प्रतिभेची ‘अंतरिक्ष’ भरारी!
![]()
“ग्रामीण भागातही गुणवत्ताधारक विद्यार्थी घडतात हे पुन्हा सिद्ध झालं,” ॲड. वर्षाताई देशपांडे यांचे प्रतिपादन.
भुईंज : रेवा तांबोळी सारखी गुणवान विद्यार्थीनी अंतराळ संशोधनासाठी इस्त्रोत दाखल होण ही घडवणा-या आई वडिलांन इतकच शिक्षण संस्थेची हि मोठे पण आहे. ग्रामीण भागात सुद्धा गुणवत्ताधारक विद्यार्थी घडू शकतात हे भुईंज पाचवड परिसराने उभ्या देशाला दाखवून दिले आहे असे प्रतिपादन ॲड. वर्षाताई देशपांडे यांनी केले.
तिरंगा इज्युकेशन सोसायटी पाचवड, आय. एफ. एस.राजेश स्वामी स्टडी सेंटर पाचवड व भुईंज प्रेस क्लब, जेष्ठ नागरिक संघ भुईंज याच्या संयुक्त सहभागाने श्रीहरीकोटा येथे सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रात प्रशिक्षाणार्थी म्हणून निवड झाल्यावदद्दल तिचे कौतुक व शुभेच्छा सोहळा पाचवड येथे आयोजित केला होता. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षाताई देशपांडे बोलत होत्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य आर. एस. पाटील तर पी एस आय पतंग पाटील विशेष उपस्थितीत होते..
यावेळी बोलताना ॲड. वर्षाताई देशपांडे पुढे म्हणाल्या की रेवा तांबोळी हिला लहान पणापासून गुणवत्ता आणि स्पर्धा यांच्याशी दोन हात करत जिंकण्याचे सामर्थ्य आई वडिलांनी तयार केले होते. तिचे सातत्य व अभ्यासपुर्ण शिक्षणामुळे ती आज सवर्वोच्च ठिकाणी असलेल्या अंतराळ प्रशिक्षण केंद्रात जात आहे. हा आपल्या सर्वांचा अभिमानाचा विषय असला तरी मुळातच पाचवड भुईंज मध्ये गुणवत्ता पुर्ण पिढी घडते. हा मोठेपणा शिक्षण संस्थांचा सुद्धा आहे असे हि त्या म्हणाल्या याच परिसरातून दिवंगत आय.एफ. एस. अधिकारी राजेश स्वामी घडले असे अनेक दाखले देत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी संयोजकांच्यावतीने मानाचा फेटा सन्मान चिन्ह देवून रेवाचा गौरव करण्यात आला. स्वागत संस्थेचे सरचिटणीस जयवंत पवार व सौ वनिता पवार यांनी केले प्रास्ताविक संस्थेच्या मार्गदर्शिका अध्यक्षा श्रीमती पुष्पलता गायकवाड यांनी केले. कार्यकमास भुईंज प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी, भुईंज जेष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, चिंधवली पाचवड येथील पदाधिकारी मीठ्या संख्येने हजर होते आभार प्राध्यापिका सौ स्वाती बोडरे यांनी मानले.
‘रेवा’च्या यशाने भुईंजचा गौरव; ग्रामीण भागातील गुणवत्तेचा पुन्हा एकदा जयघोष!
फोटो ओळी : रेवा तांबोळीचा सन्मान करताना ॲड वर्षाताई देशपांडे, आर. एस. पाटील, पी. एस. आय पतंग पाटील, जयवंत पवार व इतर मान्यवर













