महाराष्ट्र होमिओपॅथिक फीमेल डॉक्टर्स एसोसिएशन (MHFDA)तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण
सातारा : दि. १४ रोजी महाराष्ट्र होमिओपॅथिक फीमेल डॉक्टर्स एसोसिएशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. सदरचा पुरस्कार वितरण समारंभ अण्णासाहेब पाटील सभागृह कोपरखैरणे, नवी मुंबई येथे पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाहुबली शहा (प्रशासक- महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी), आमदार मान. विक्रमजी पाचपुते(श्रीगोंदा, अहिल्यानगर), आमदार मान. डॉ ज्योती गायकवाड (धारावी, मुंबई), अॅड. सायली शिंदे, (नगरसेविका, नवी मुंबई महानगरपालिका) यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी होमियोपॅथी मधील विविध क्षेत्रांमध्ये अत्युच्च कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रामधील महिला डॉक्टरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यातील डॉ शुभदा पालेकर यांना जीवनगौरव पुरस्कार, तसेच डॉ अनुराधा चव्हाण भोसले यांना रिसर्च आणि academic excellence या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
सदरचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न करण्यासाठी MHFDA च्या राज्य अध्यक्षा डॉ रुपाली कैलाश गोसावी, सचिव डॉ आरती नल्लू, तसेच राज्यस्तरीय कार्यकारिणी सदस्या आणि जिल्हा समन्वयक म्हणून डॉ सपना गांधी या सर्वांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली.
यावेळी सातारा जिल्हा अध्यक्षा डॉ हर्षला बाबर, सचिव डॉ शस्मिता जैन, सहसचिव डॉ प्रतिभा मोटे तसेच सातारा कार्यकारिणी सदस्या डॉ. श्वेता बागडे या उपस्थित होत्या. पुरस्कर्त्या महिला डॉक्टरांचे समाजाच्या विविध स्तरांमधून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.













